विवाहाची तारीख घ्यायला आले, लग्नच लावून गेले…!
रावेर (शेख शरीफ)
रावेर येथील गौसिया मशिद जवळ मयत झालेले मजीद खा सांडे खा डाबर कंपनी वाले यांची मुलगी सानिया बी मजीद खा व अजंठा तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथून आलेले शफी खान यांचा मुलगा सलमान खान यांच्यासोबत तारीख च्या कार्यक्रम होता. तो कार्यक्रम लग्नामध्ये बदल करण्यात आला व त्याच दिवशी सदर तारीख न घेता लग्न करण्यात आले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा तारीख घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता . अजंठा तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथून आलेले नवरदेवाचे नातेवाईकांनी मुलीच्या नातेवाईकांना यांच्याकडे तारीख ना ठरवता थेट लगन करून घ्यावे अशी विनंती केली व दोन्हीकडच्या नातेवाईकांच्या विनंतीचा मान देऊन इस्लाम धर्मातील प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकनीस अनुसरून लगन समारंभ हा साध्या पद्धतीने करावे ही शिकवण दिली आहे. वर पक्षाची विनंती मान देऊन तारीख न ठरता थेट लगन करून देण्यास होकार दिला व समाजात नवीन आदर्श निर्माण केला या आदर्श विवाह सोहळा साठी शहरातील युवा मंडळी धार्मिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला व हा आदर्श विवाह सोहळा गौसिया मस्जिद जवळ पार पडला.
यशस्वी करण्यासाठी रावेरचे केंद्रप्रमुख रईस शेख, आसिफ मेंबर, सादिक मेंबर, आयुब मेंबर, अशफाक सेट, उस्मान मिस्त्री, इम्रान भाई डॉक्टर, वसीम हाजी मुस्तफाखान(अमीर सहब), जाबीर भाई इस्माईल भाई तसेच मशीदचे ट्रस्टव इमाम सहाब इस्माईल खान रईसभाई मेंबर व सर्व( अजंठा तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद) व रावेरचे सर्व नातेवाईकांनी आनंद व्यक्त केलेले व अशाच सोप्या रितीने लग्न करावे असे आवाहन रहमान मलिक यांनी केले.