पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
सोलापुर , दि. २९ :- राष्ट्रिय अध्यक्ष ,आमदार,प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर,राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने माळशिरस तालुक्यातील महा ई सेवा केंद्राच्या तक्रारीचे निवेदन जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने सातबारा उतारा,विविध प्रकारचे दाखले,प्रतिज्ञापत्र गावातच लोकांना मिळावेत यासाठी प्रत्येक गावात महा ई सेवा केंद्राला परवानगी दिली यामुळे लोकांना माळशिरस तहसिल कार्यालयात जाण्यासाठी होणारा खर्च व वेळ याची बचत झाली परंतू माळशिरस तालुक्यातील काही गावातील महा ई सेवा केंद्र हे ज्या गावात चालवण्याची परवानगी मिळाली आहे त्या गावात न चालवता ते इतर गावात चालवतात त्यामुळे त्या गावातील लोकांना इतर गावात जावून दाखले व इतर कामे करावी लागतात.मंडल अधिकारी व तलाठी यांना या सर्व गोष्टी माहित असतानाही ते या महा ई सेवा धारकांना पाठीशी घालत आहेत त्यामुळे अशा सर्व महा ई सेवा धारकांची परवानगी त्वरित रदद करून या महा ई सेवा धारकांना पाठीशी घलणारे तलाठी व मंडल अधिकारी यांचेवरही करवाई करावी अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा मागनीचे निवेदन जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना देण्यात आले.
यावेळी उमेश वाघमारे,संतोष गायकवाड,हनुमंत पाटोळे,सोमनाथ पवार,शिवम गायकवाड,सचिन कांबळे,शिवाजी खड़तरे,स्वप्निल शिरसट,बबलू गाड़े आदी यावेळी उपस्थित होते.
Post Views: 327