Home वाशिम सोयाबीन चोरीतील २ आरोपी रतलाम,इंदौर मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेऊन गजाआड करुन ३४.७...

सोयाबीन चोरीतील २ आरोपी रतलाम,इंदौर मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेऊन गजाआड करुन ३४.७ लक्ष मुददेमाल जप्त

151

 

वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वाशिम:-दिनांक ०७/०४/२२ रोजी पोलीस स्टशेन जऊळका येथे फिर्यादी नामे गोपाल सुभाषचंद्र बंग वय ३७ वर्षे रा कन्हेरगाव ता जि हिंगोली यांनी फिर्याद दिली की, त्यांनी मारुती ॲग्रो अँड फुडस जऊळका या गोडावुन मधील २५०.६५ क्विंटल सोयाबीन २४४ बॅग कि. २०,७९,१४२२/- रुपये असा माल बाराचाकी ट्रक क्र एमएच १८ बीजी ५९९२ या ट्रक मध्ये लोड करुन ट्रक चालक जाबीर खान पठाण यांचे कडे गोयल प्रोटिन्स लिमिटेड पत्ता एनएस ५२ कासार कोट, राजस्थान येथे घेऊन जाण्यास सांगितले असता यातील आरोपीतांनी संगनमत करुन अपहार करुन माल दुसरीकडे कुठेतरी घेऊन गेले. अशा जबानी वरुन पोलीस स्टेशन जऊळका येथे अपक्र ८८/२२ कलम ४०६,४०७,४१८,४६८,४७१,३४ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदर गुन्हयाचा तपास करीत असता पोलीस ठाणे जऊळका नमुद गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपीतांनी चोरी केलेल्या वाहनाच्या कागदपत्राच्या आधारे ट्रक वाहनास बनावट नंबर प्लेट व मोबाईल सिम कार्ड प्राप्त करुन गुन्हयात वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक व अदयावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुन्हयाची उकल करुन नमुद गुन्हयातील १) अनिस अब्बासी वय ५५ वर्षे रा जावरा जि रतलाम, मध्यप्रदेश, २) सलीम खाँ इमाम खाँ वय ६३ वर्षे रा. ३४ इलीयास कॉलनी, खजाराना इंदोर, मध्यप्रदेश येथेन अटक करण्यात आले.
नमुद आरोपीतांकडुन गुन्हयात वापरण्यात आलेला ट्रक किंमत अंदाजे २० लाख रुपये अंदाजे २४४ पोते २० टन किंमत १४,७०,०००/- रु चे सोयाबीन असा एकुण ३४,७०,०००/- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन जऊळका हे करीत असुन गुन्हयात अटक करण्यात आलेले आरोपी व मुददेमाल पोलीस स्टेशन जऊळका यांचे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात,अपर पोलीस अधीक्षक
गोरख भामरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोमनाथ जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद
इंगळे, पोलीस हवालदार दिपक सोनवणे, पोलीस नाईक अमोल इंगोले, अश्विन जाधव, सायबर सेल चे पोलीस शिपाई प्रशांत चौधरी,गोपाल चौधरी यांनी केली आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206