Home विदर्भ समाजातील लोकांपर्यंत व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण पोहचविण्याचा प्रयत्न – सौ. आरतीताई कारंजेकर

समाजातील लोकांपर्यंत व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण पोहचविण्याचा प्रयत्न – सौ. आरतीताई कारंजेकर

220

वर्धा (प्रतिनिधी) कुठल्याही परिस्थितीत आपल्या शब्दावर ठाम रहाण्याचा स्वभाव सौ.आरतीताई कारंजेकर यांचा असून प्रामाणिकपणाने समाजातील लोकांपर्यंत व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण कसे पोहचेल या बाबत त्या कार्यरत आहेत.
एक दिवस नक्कीच समाजातील लोकांवर, विद्यार्थ्यांवर महिलांवर परिवर्तन होऊन त्यांचा व्यक्तीमत्व विकास होईल असा विश्वास आरतीताई यांना आहे.
आरतीताई प्रभावीपणे समाजाप्रती मत मांडून परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहे.
महींलानी व्यक्तिमत्व विकासासोबतच सर्वच क्षेत्रात उतुंग भरारी घेण्याकरिता सकारात्मक उर्जा निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे महिलांना आपल्या प्रशिक्षनातुन सागितले जाते.
सकारात्मक राहील्यास यश नककीच पदरी पडेल या विचारावर महिलांनी ठाम राहिल्यास स्त्रिशक्तीचा पराभव कधीच होणार नाही असे त्या महिलांना सांगतात.
समाजात जनजागृती व्हावी याकरिता अनेक सामाजिक संघटणा समाजाप्रती काम करतात.परंतु प्रत्येक महिलेचा , विद्यार्थ्यांचा व समाजातील सर्व घटकाचा व्यक्तीमत्व विकास व्हावा हा दृष्टिकोन डोळ्या समोर ठेवून काम सुरू केले हे नक्कीच अभिनंदनीय आहे.
प्रत्येक महाविद्यालयामध्ये,महिला बचत गटातील संघटिका यांना भेटून इवल्याश्या विद्यार्थ्यांवर याचे सकारात्मक परिणाम होवून व्यसनापासून दुर कसे राहतील आईवडील जे विद्यार्थ्यांवर शिक्षणाकरीता खर्च करतात त्या संधीचे सोने कसे होईल याबाबत कौशल्य पणाला लावून सकारात्मक उर्जा निर्माण करून विद्यार्थ्यांच्या मनात एक चागंली कल्पना येवून तो कसा सक्षम होईल याकरीता आरतीताई विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्त्व विकास व्हावा याकरीता मार्गदर्शन करतात. आपण समाजासाठी काहीतरी करावे या भावनेने
त्या स्वतः प्रेरित होऊन इतरांना प्रेरित करतात. विद्यांर्थ्यांना उद्याचा धोका काय आहे हे लक्षात आणून देवून धोकादायक परिस्थिती येवूच नये याकरीता ते प्रयत्नशील आहेत.
आज त्यांचा वाढदिवस आहे..
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.!!!