जिल्हा प्रतिनीधी जीवन माळी नंदूरबार
नंदुरबार शहरातील साक्री नाका जुनी पाण्याची टाकी परिसरात एका बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. कोणतीही डीग्री नसतांना दवाखाना उघडून हा डॉक्टर पेशंटवर उपचारकरताना मिळुन आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार पंचायत समिती चे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जाफर तडवी यांनी गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली असता शहरातील साक्री नाका जुनी पाण्याची टाकी परिसरात प्रदीप तपन विश्वास (वय ३२ रा. मराफिरी
सिंबादीन, बोकारो, झारखंड) हा कोणतीही वैद्यकीय क्षेत्रातील डिग्री नसतांना शक्ती क्लिनिक नावाचा दवाखाना उघडून पेशंटवर उपचार करताना मिळुन आला. त्यांचाजवळ औषधांचा साठा मिळून आला. सदर कारवाई दि. १३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.