Home विदर्भ मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात 5 रुग्णावर बिनटाक्याची गर्भाशय शस्त्रक्रिया यशस्वी

मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात 5 रुग्णावर बिनटाक्याची गर्भाशय शस्त्रक्रिया यशस्वी

301

 

अमरावती / मोर्शी – महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथेहेडलाईन्स…..मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात 5 रुग्णावर बिनटाक्याची गर्भाशय शस्त्रक्रिया यशस्वी “बिनटाक्यांची गर्भशय शस्त्रक्रिया” ही एकूण ०५ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून शिबिर पार पडले .
या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ.विनोद चव्हाण , सर्जन डॉ.अश्विन सोनटक्के ,डॉ. नरेश रावलानी , डॉ. नितीन जाधव, डॉ. कविश सांगोले, डॉ. सागर श्रीराव , भुलरोग तज्ञ म्हणून डॉ. विजय कळसकर यांची विशेष उपस्थिती, यांनी कारोनाच्या परिस्थितीत सुद्धा शासनाचे सर्व नियम पाळून हे शिबिर यशस्वी पार पाडले.

हे शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद निरवाने , डॉ. प्रशांत घोडाम , महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जिल्हा समन्वयक डॉ.सचिन सानप , जिल्हा प्रमुख गजानन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पाडले. तसेच उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील डॉ.सचिन कोरडे , डॉ. मोहम्मद शारिख शेख, डॉ.साबळे, OT स्टाप, वगारे सिस्टर, कमलेश किरणाहाके ब्रदर, अर्चना वानखडे सिस्टर, आरोग्य कर्मचारी श्री.विनय शेलुरे,सुजित वानखडे,प्रवीण कापडे, आशा बोयत, कमलाबाई तायवाडे, विजय दाभोडे, आकाश जौजळकर, नौशाद शाहा, महात्मा ज्योतिबा फुले जन व आयुष्यमान भारत योजनेतील राष्ट्रपाल शंभरकर, प्रकाश पांडे, सुजाता पांडे, सर्व अधिकारी व कर्मचारी शिबिराच्या यशस्वीतेकडे यांनी अथक परिश्रम घेतले. शिबिरांचे समारोप रुग्णांच्या वैयक्तिक भेटी घेऊन सविस्तर पणे माहिती देऊन करण्यात आली.