Home जळगाव रावेर येथील कणखर पत्रकार ईश्वर महाजन यांची श्री संत सावता माळी युवक...

रावेर येथील कणखर पत्रकार ईश्वर महाजन यांची श्री संत सावता माळी युवक संघाच्या जिल्हा संघटक पदी निवड

246

 

रावेर (शेख शरीफ)
शांत, संयमी, मितभाषी, यशाची उत्तुंग भरारी घेत असताना पाय जमिनीत घट्ट रोवून ठेवणारे, जे पोटात तेच ओठात असणारे रोखठोक व्यक्तिमत्त्व,गरजूंच्या मदतीला धावून जाणारे मदतगार,निर्भिड पत्रकार, अभ्यासू, विचारवंत, शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक, रावेर येथील पत्रकार व राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे रावेर तालुका अध्यक्ष श्री ईश्वर रामदास महाजन यांची श्री संत सावता माळी युवक संघाच्या जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली असून श्री संत सावता माळी युवक संघाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र जिजाबरव माळी यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यावेळी विश्व गामी पत्रकार संघाचे अतुल विंचुरकर संतोष पाटील योगेश पाटील राहुल जैन, व खानापूर येथील पत्रकार उमाकांत मराठे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.