Home यवतमाळ घाटंजी येथे शारिरीक व मानसिक छळ केल्या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात चौदा...

घाटंजी येथे शारिरीक व मानसिक छळ केल्या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात चौदा आरोपी विरूध्द गुन्हा दाखल..!

465

 

➡️ दोन्ही प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात स्थगिती.

(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी : घाटंजी येथील दोन प्रकरणात 14 आरोपींनी फिर्यादीची शारिरीक व मानसिक छळ केल्या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात 14 आरोपी विरूध्द गुन्हे नोंदविण्यात आले आहे. आरोपी मयुरी किसनराव आडे हिने दाखल केलेल्या फौजदारी याचीकेवरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक, न्यायमुर्ती अमित बी. बोरकर यांनी स्थगीती दिली आहे. फिर्यादी मयुरी आडे हिची बाजू प्रसिद्ध फौजदारी वकील अँड. राजेंद्र डागा (नागपूर) यांनी न्यायालयात मांडली. सदर प्रकरणात गैरअर्जदार म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे पोलीस ठाणे दिग्रस व ईतरांचा समावेश आहे.
घाटंजी येथील गुरुदेव वार्डातील प्रा. रवी नामदेवराव आडे सोबत दिग्रस येथील दिपीका हिचा 5 एप्रिल 2015 रोजी विवाह झाला होता. तसेच दिपीकाची मोठी बहीन जान्हवी हिचा विवाह संजय नामदेवराव आडे सोबत 9 जुन 2011 रोजी झाला होता. अगोदर दोन्ही कुटुंब सुरवातीला आंनदाने राहत असतांना घरात घरगुती वाद सुरू झाला. त्यातच फिर्यादी दिपीका रवी आडे हिला पती प्रा. रवी नामदेवराव आडे हा अश्लिल शिवीगाळ करून अमानविय मारहाण करून शारिरीक व मानसिक त्रास देउन पिळवणूक करत असल्याची तक्रार 18 जानेवारी 2020 रोजी घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यावरुन फिर्यादीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र, घाटंजी पोलीसांनी कोणताही गुन्हा नोंदविला नाही. त्या नंतर 10 जानेवारी 2021 रोजी फिर्यादी दिपीका रवी आडे हिने दिग्रस पोलीस स्टेशन गाठुन संशयित आरोपी विरूध्द लेखी तक्रार दाखल केली. त्या वरुन दिग्रस पोलीसांनी दिपीका हिच्या लेखी तक्रारीवरुन व महिला समुपदेशक कक्ष दारव्हा यांच्या अहवालावरुन
अपराध क्रंमाक 28 अन्वये 10 जानेवारी 2021 रोजी संशयित आरोपी पती प्रा. रवी नामदेवराव आडे, सासरा नामदेवराव अमरसिंग आडे, सासु नर्मदा नामदेवराव आडे, भाउ संजय नामदेवराव आडे, प्रविण नामदेवराव आडे, विना प्रविण आडे व मयुरी किसनराव आडे विरुद्ध भादंवि कलम 498 (अ), 323, 504, 506 व 34 अंतर्गत गुन्हे नोंदवून जमादार शालीक राठोड यांनी तपास सुरू केला. तसेच फिर्यादी जान्हवी उर्फ मयूरी संजय आडे हिच्या दुसऱ्या लेखी तक्रारीवरुन संशयित आरोपी पती संजय नामदेवराव आडे, सासरा नामदेवराव अमरसिंग आडे, सासु नर्मदा नामदेवराव आडे, प्रा. रवी नामदेवराव आडे, प्रविण नामदेवराव आडे, विना प्रविण आडे व मयुरी किसनराव आडे विरुद्ध अपराध क्रंमाक 29 अन्वये भादंवि कलम 498 (अ), 323, 504, 506 व 34 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले.
सदर प्रकरणाचा तपास सुरु असतांना सदर प्रकरणातील आरोपी मयुरी किसनराव आडे हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी याचीका क्रं. 429/21 व 431/21 दाखल करुन सीआरपीसी 482 अंतर्गत सदरचा एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. सदर प्रकरणात अँड. राजेंद्र डागा यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन सदर प्रकरणात उच्च न्यायालयाने 18 मार्च 2021 रोजी स्थगिती दिली.
सदर प्रकरण सद्यातरी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय व्हि. एम. देशपांडे, न्यायमुर्ती अमित बी. बोरकर यांच्या न्यायालयात सुरु असून सदर प्रकरणात पुढील सुनावणी 30 जुन रोजी आहे. सदर प्रकरणात अर्जदारांतर्फे अँड. ए. वाय. शर्मा, गैरअर्जदार क्रमांक 2 तर्फे अँड. ए. आर. चव्हाण, तर सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अँड. टि. ए. मिर्झा आदीं काम पाहत आहे.