Home औरंगाबाद औरंगाबाद पत्नीला नीट साडीही नेसता येत नाही म्हणून पतीने घेतला धक्कादायक निर्णय ,...

पत्नीला नीट साडीही नेसता येत नाही म्हणून पतीने घेतला धक्कादायक निर्णय , ?

739

 

अमीन शाह

पत्नीवर नाराज असलेल्या एका पतीने धक्कादायक कारण देत आत्महत्या केली आहे. हे कारण त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नोंदवले आहे. पत्नी मनासरखी मिळली नाही. तसेच, तिच्या सवयीसुद्धा आपल्याला पटत नाही. तिला साधी साडीही निट नेसता येत नाही . आय क्विट, असे म्हणत या पतीने आत्महत्या केली आहे. सुसाईड नोट पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटले आहे. ही घटना औरंगाबद शहरातील मुकुंदवाडी परिसरात असलेल्या राजानगर येथे पुढे आली आहे. अजय समाधान साबळे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून, तो 25 वर्षांचा आहे.

अजय साबळे हा प्लंबर आहे. प्लंबिंगचे काम करुन तो घर चालवतो. आई वडीलांसोबत राहणाऱ्या अजय याचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. विवाहानंतरीही आपल्या पत्नीला घेऊन तो आईवडीलांसोबतच राहात होता. दरम्यान, या नवदाम्पत्यामध्ये विविध कारणांवरुन खटके उडत असत. दरम्यान, पत्नी माहेरी गेली असताना त्याने मोबाईलवर ‘आय क्विट’ असे स्टेसट ठेवले. दरम्यान, त्याचे स्टेटस पाहून त्याचा मित्र त्याला तातडीने भेटायला घरी आला. तो त्याच्या खोलीत गेला असता त्याने गळफास घेतल्याचे पाहायला मिळाले. अजयचा मित्र आणि कुटुंबीयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. प्राप्त माहितीनुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अजयला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचारापुर्वीच त्याला मृत घोषित केले. अजयची सुसाईड नोट पोलिसांना सापडली. यात त्याने लिहिले आहे की, त्याला मनासारखी पत्नी तर मिळाली नाहीच. परंतू, तिच्या सवयीसुद्धा त्याला पटत नव्हत्या. तिला स्वयंपाक करता येत नाही. तिला हॉटेलमध्ये भोजनास घेऊन गेले तर ती तिथेही तिच्या जेवणाची थाळी उचलून दुसरीकडे ठेवते. तिला साधी साडीही निट नेसता येत नाही, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. दरम्यान, सुसाईड नोटमध्ये असलेले अक्षर हे त्याचेच आहे काय या बाबत पोलीस तपास करत आहेत. हे अक्षर आता तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.

 

फोटो सौजन्य , गूगल