लाखो रुपयांचे नुकसान…!
आलेगाव , दि. १७ (प्रतिनिधि ) – पातूर तहसील अंतर्गत येत असलेल्या ग्राम मळसुर येथे अच्यानक लागलेल्या आगीमध्ये तीन घरे जळून खाक झाले असून आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना दि १७ रोजी घडली.
प्राप्त माहिती नुसार पातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या मळसुर येथील गावामध्ये अच्यानक दि १७ रोजी दुपारच्या वेळेस लागलेल्या आगीमध्ये गोपाल नारायण तायडे,ईश्वर नारायण तायडे, आणि संदीप नारायण तायडे तसेच आगीच्या लपेट मध्ये शेजारीच असलेल्या रमेश तायडे,दशरथ तायडे,उत्तम तायडे,रमेश लोखंडे यांच्या गोठ्याला आग लागून गोठ्यातील कुटार तसेच वायरचे बंडल, आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले.तसेच गोपासल तायडे यांनी खरीप पेरणी करिता घरात ठेवलेले ७० हजार रुपये आगीमध्ये जळून झाले.सदर आगीमुळे जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गावात असलेल्या तीन टँकर,तसेच जवळच असलेल्या शेतातील बोअर वेल वरून पाईपच्या सहाय्य ने आगीवर नियंत्रण मिळवण्यास गावकऱ्यांना मदत झाली.आणि पुढील अनर्थ टळला.घटनेची माहिती महसूल विभाग व चांन्नी पोलीस स्टेशनला कळताच तलाठी यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला.तसेच पोलीस प्रशासना तर्फे पंचनामा करण्यात आला. झालेल्या नुकसानी ची भटपाई शासन स्तरावर करण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त कडून मागणी होत आहे.