जिल्हा प्रतिनीधी जीवन माळी नंदूरबार
नंदूरबार – दिनांक १६/०५/२०२२ सोमवार रोजी या विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतमबुद्ध बुद्धपूर्णिमा निमित्त “तथागत भगवान गौतम बुद्ध”यांच्या प्रतिमेला आणि विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प पूजन वंदन करून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले,भीम आर्मी नंदुरबार जिल्हाध्यक्ष माननीय. संजूभाऊ रगडे यांच्या नेतृत्वाने यांच्या मार्गदर्शनाने आणि भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याच्या
टीमच्या वतीने भीम आर्मी पाठशाळा यांच्या वतीने शालेय गरजू गरीब विद्यार्थ्यांना पहिली ते बारावी पर्यंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना पेन पेन्सिल कंपास पेटी नोट्स बुक पाटी पुस्तक लॅपटॉप बॅग सर्व कीट उपलब्ध करून विद्यार्थ्यांना, मान्यवर, भीम आर्मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय, दत्तू जी मेंढे साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते सन्मानाने शालेय विद्यार्थ्यांना किट देण्यात आले, आणि सर्व भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यां चा हस्ते सन्मानाने शालेय कीट देण्यात आले, विद्यार्थ्यांच्या आई वडील आजी,बाबा शाळेत लागणारे सर्व किट ला बघून खूप खुश झाले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक नारा दिला होता,”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा सुंदर सा नारा महापुरुषांनी दिला होता, भीम आर्मी राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी दत्तूची मेंढे साहेबांच या कार्यक्रमांमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले, त्याचप्रमाणे सर्व भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या या कार्यक्रमांमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले, सर्व भीम आर्मी च्या पदाधिकारी कार्यकर्ता आणि गौतम नगर भीम सैनिकांच्या आणि माझ्या सर्व माता भगिनींच्या आणि माझा सर्व चिमुकल्यांच्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थिनींच्या उपस्थित, असा हा सुंदर असा आगळा वेगळा कार्यक्रम गौतम नगर भारतरत्न डॉक्टर,बाबासाहेब आंबेडकर सभागृह भीम आर्मी पाठशाळा रेल्वे कॉलनी नंदुरबार येथे संपन्न झाला, उपस्थित मान्यवर, भीम आर्मी राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्तू जी मेंढे साहेब भीम आर्मी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष संजू भाऊ रगडे भीम आर्मी नंदुरबार जिल्हा प्रवक्ता लोटन भाऊ पेंढारकर भीम आर्मी नंदुरबार जिल्हा कार्यकर्ता रविभाऊ रगडे भीम आर्मी शहादा तालुका अध्यक्ष राहुल भाऊ आगळे भीम आर्मी नंदुरबार जिल्हा संघटक भैय्यासाहेब पिंपळे नंदुरबार तालुका अध्यक्ष शरद भाऊ पिंपळे नंदुरबार शहराध्यक्ष मोगेश भाऊ भालेराव नंदुरबार जिल्हा सचिव विशाल भाऊ रामराजे भीम आर्मी शहादा तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण भाऊ गवळे वरिष्ठ पदाधिकारी फणसे बापूसाहेब आणि सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता भीमसैनिक उपस्थित होते, जयभीम जय भीमआर्मी जयशिवराय जयसंविधान जयआदिवासी जयवाल्मिकी जयलहुजी