Home नंदुरबार एक लाखाचा आयफोन लांबविणान्या एकास काही तासात अटक ; नंदुरबार शहर पोलीसांची...

एक लाखाचा आयफोन लांबविणान्या एकास काही तासात अटक ; नंदुरबार शहर पोलीसांची दबंग कामगिरी

173

 

प्रतिनीधी जीवन माळी नंदूरबार

नंदुरबार (प्रतिनिधी) रूग्णालयातील पलंगावरुन एक लाखाचा आयफोन चोरीला गेल्याची घटना नंदुरबार येथील सेवा हॉस्पिटलमध्ये घडली. चोरी झाल्यानंतर काही तासातच नंदुरबार शहर पोलीसांनी आयफोन चोरणाऱ्या एकाला अटक केली आहे.
नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथील डॉ. निलेश हेमंतकुमार शर्मा यांनी नंदुरबार शहरातील सेवा हॉस्पिटलमध्ये रिसेप्शन रूममधील लोखंडी पलंगावर १ लाख ७ हजार रुपये किंमतीचा आयफोन मोबाईल ठेवला होता. अनोळखी चोरट्याने रात्रीतुन पलंगावरुन आयफोन मोबाईल चोरुन नेला. याबाबत डॉ. निलेश हेमंतकुमार शर्मा यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुध्द भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याची दखल घेत नंदुरबार शहर पोलीसांनी रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासली. यावेळी आयफोन मोबाईल चोरी करतांना विनोद पवार हा सीसीटीव्हीत कैद झाल्याचे दिसून आले. त्या आधारे पोलीसांनी काही तासातच नंदुरबार शहरातील गिरीविहार गेट परिसरातुन विनोद पवार (रा. छोटा धनपूर ता. तळोदा) यास अटक केली. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस उपनिरीक्षक मोहिते, हेकॉ. गोसावी, पोकॉ. पांढारकर यांच्या पथकाने केली.