Home यवतमाळ डॉ.निरजभाऊ वाघमारे सारख्या उदार अंतःकरणाच्या कार्यकर्त्याला समाजाने जोपासले पाहिजे – निलेश विश्वकर्मा

डॉ.निरजभाऊ वाघमारे सारख्या उदार अंतःकरणाच्या कार्यकर्त्याला समाजाने जोपासले पाहिजे – निलेश विश्वकर्मा

302
यवतमाळ (प्रति) एक दिलदार कार्यकर्ताच दुसऱ्या सच्च्या कार्यकर्त्यांचा मानसन्मान आणि त्यांच्या कार्याचे मोल करु शकतो. हे डॉ. निरज वाघमारे यांनी दाखवून दिले असुन समाजानेही असे निरज वाघमारे सारखे कार्यकर्ते टिकवले पाहिजे, त्यांना मोठे केले पाहिजे असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केले. ते पुढे म्हणाले की, समाज प्रगल्भ व प्रगत व्हावा म्हणुन ज्यांचा सत्कार आपण केला त्यांच्यासारखे कार्यकर्ते झटत असतात आणि उदार अंतःकरणाचे निरजसारखे कार्यकर्ते त्यांचा मानसन्मान करतात. समाजानेही या सर्व कार्यकर्त्यांना जोपासतांना त्यांना पद व प्रतिष्ठेच्या जागी बसवले पाहिजे. असे प्रतिपादन विश्वकर्मा यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मुख्य संयोजक डॉ.निरज वाघमारे म्हणाले की, मानापमान सहन करत समाजसेवा करणारे कार्यकर्ते दुर्मिळ होत चालले आहेत. कारण समाजातील पोटं भरलेल्या लोकांना कार्यकर्त्यांना टोमणे मारण्याची सवय जडलीआहे. आरोप व दुषणे सहन करुनही काही कार्यकर्ते अथक परिश्रम घेतात. प्रसंगी घरादारावर कुटुंबियांकडेही दुर्लक्ष करतात. शिरी घेतलेली जवाबदारी पार पाडतात. यवतमाळच्या मातीतल्या अशा कार्यकर्त्यांचा एकाच ठिकाणी सन्मान करावा म्हणून हा सोहळा आयोजीला. यवतमाळकरांनी प्रचंड प्रतिसाद देत आयोजनाला साधुवाद देत या नेत्रदीपक समारंभाला साकार रुप दिले. त्याबद्दल
यवतमाळ करांसह मा. निलेश विश्वकर्मा यांचे व सत्कारीत कार्यकर्त्यांचे आभार मानले.

दिनांक १७ मे २०२२ रोजी डॉ.निरज वाघमारे मित्र परिवार यवतमाळ द्वारा स्थानिक नंदुरकर विद्यालयाचे प्रांगणात “बुद्ध जयंती” निमित्त ख्यातनाम गायिका कडुबाई खरात यांच्या बहारदार प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या मध्यंतरी संपन्न झालेल्या दिमाखदार सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थानी निलेश विश्वकर्मा होते. आंबेडकर जयंती साठी राबनाऱ्या शहरातील विविध आंबेडकर जयंती मंडळांचे अध्यक्ष सर्वश्री आनंद गायकवाड, गोवर्धन भगत, नितीन वानखेडे, प्रा. सत्यवान देठे, ऍड. नरेंद्र मेश्राम, डॉ. अंकीत देठे, निर्मलाताई पाते, रत्नमाला ताकसांडे, अजय खंतडे, सुरज गोविंदराव मेश्राम यांचा प्रतिनिधीक सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर ख्यातनाम गायीका कडुबाई खरात, कारंजा न.प.चे अध्यक्ष शेषराव ढोके, मोहन राठोड, लक्ष्मण पाटील, लक्ष्मिकांत लोळगे, धम्मवती वासनिक, पुष्पा शिरसाट, कुंदन नगराळे, आकाश वाणी याची उपस्थिती होती.
कडुबाईंच्या गायनाने यवतमाळकरांना भुरळ घातली. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हायरं…, आणि माह्या भिमानं माय सोन्यांन भरली ओटी… या गितावर रसिकांना थिरकायला लावले हे विशेष. सत्कार मुर्तींच्या वतिने जेष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते आनंद गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. तर सुनिल वासनिक यांनी सुत्रसंचलन व दत्ता हाडके यांनी आभार मानले.