Home मराठवाडा जालन्यात तब्बल ४ कोटीच्या खंडणी साठी १६ वर्षाच्या मुलाचे अपहरण,५ तासानंतर आरोपी...

जालन्यात तब्बल ४ कोटीच्या खंडणी साठी १६ वर्षाच्या मुलाचे अपहरण,५ तासानंतर आरोपी च्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश..

935

 

जालना -लक्ष्मण बिलोरे

जालना शहरात एका व्यवसायिकाच्या दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण करून तब्बल ४ कोटीची खंडणी मागितल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आलाय, या प्रकरणी पोलिसांनानी तातडीने सूत्र हलवून अवघ्या ५ तासात मुलाला शोधण्यात यश आले आहे. शहरातील व्यवसायिक महावीर गादिया यांचा १६ वर्ष वयाचा मुलगा स्वयंम् हा १० वी ची परीक्षा देण्यासाठी पोद्दार शाळेच्या परीक्षा केंद्रावर गेला होता,मात्र साडेबारा वाजता परीक्षा संपून ही तो घरी परत आला नाही, म्हणून पालकांनी चालकाच्या मोबाईल वर संपर्क केला असता अज्ञात अपहरणकर्त्यांनी मुलगा हवा असल्यास चार कोटीं रुपये आणून देण्याची मागणी केली, यावेळी पोलिसांनी जिल्ह्यात मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करून चालकाचा मोबाईल ट्रेस केला असता सदर मुलगा अंबड रोडवरील शहापूर जवळ चालकासह आढळून आला, या प्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून पोलीस इतर अपहरणकर्त्याचा या प्रकरणात शोध घेत आहेत.