रावेर (शेख शरीफ)
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सुकन्या खासदार सुप्रिया सुळे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आल्या असताना मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी नेते एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे रावेर तालुका उपाध्यक्ष सरफराज उर्फ राज तड़वी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. तसेच सरफराज तड़वी यांची राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड झाल्यामुळे सरफराज उर्फ राज तड़वी यांना त्यांच्या कडुन शुभेछ्या देण्यात आल्या.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविंद्रभैया पाटील,जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा तथा राज्य वस्त्रोद्योग संघाच्या उपाध्यक्ष रोहिनीताई खडसे,सामाजिक कार्यकर्ते,तांदलवाडी सरपंच सुरेखाताई तायडे,ग्रा.पं.सदस्य सुरेखाताई कोळी ,राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा सरचिटणीस माया बारी व कार्यकर्ते उपस्थित होते.