Home मराठवाडा आगीत लाखों रुपयांचे जीवनावश्यक वस्तू खाक

आगीत लाखों रुपयांचे जीवनावश्यक वस्तू खाक

224

 

घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे

शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागून संपूर्ण घर बेचिराख झाल्याची घटना अंबड तालुक्यातील नालेवाडी येथे दि १७ मे रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास घडली.या आगीत घरातील कपडेलत्ते,धान्य व साहित्य जळून भस्मसात झाले आहे.या घटनेत दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
                 

तालुक्यातील नालेवाडी येथे प्रकाश किसनराव चाटे (वय ५२ वर्षे) यांचे घर आहे.सोमवारी रात्री १.३० वाजेच्या दरम्यान लहान बाळ रडू लागल्याने इतरांना जाग आली.आणि सर्वांचे लक्ष घराच्या मागील दोन खोल्यांकडे गेले.या दोन्ही खोल्यामधून आगीचे लोट निघत होते.त्यामुळे एकच गोंधळ उडाला.आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील लोक धावून गेले.परंतु घरातील फ्रीज,कुलर,कपाट, सोफासेट व लाकडी पलंगा सह इतर वस्तूंनी पेट घेतल्याने आग आटोक्यात येत नव्हती.

त्यात गॅसच्या टाकी तिथेच असल्याने टाकीचा स्फोट होईल या भीतीने गावकरी धास्तावले होते.आग आटोक्यात येत नव्हती.उलट संपूर्ण घर या आगीने कवेत घेतले.गावकरी पाणी आणून घर विजवण्याचा प्रयत्न करत होते.परंतु आग भडकत होती.गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

तसेच आगीत २ पोते बाजरी,२ पोते गहू व ज्वारी हे आगीत जळून भस्मसात झाले.घरातील संपूर्ण साहित्य,कपडे,धान्य आणि जळाले आहे.असे सुमारे दीड ते २ लाख नुकसान झाले आहे.आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. वस्तीत घर असल्याने आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला होता.

परंतु वेळीच आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.यात त्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेचा पोलिसांनी,ग्रामसेवक व तलाठी यांनी पंचनामा केला आहे.पुढील तपास पो.कॉ.दिलवाले हे करत आहेत.आग विझविण्यासाठी मनोहर बांगर,सुदर्शन बांगर,रंजित बांगर,रवी बांगर यांच्यासह ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली.

प्रकाश चाटे हे अल्प भूधारक शेतकरी आहेत.आगीत संसारुपयोगी व शेती साहित्य भस्मसात झाले असून या कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.तरी महसूल प्रशासनाने तत्काळ मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.