रावेर (शेख शरीफ)
श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांचे जळगाव जिल्हा संघटक व राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे रावेर तालुका अध्यक्ष ईश्वर महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचेकडे इमेल द्वारे केली आहे.रावेर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने रुग्णांची फरफट पाहवली जात नाही.तसेच रावेर हे तालुक्याचे ठिकाण असून येथे पूर्णवेळ डॉक्टर नसल्याने खेड्यापाड्यातुन येणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते व तो आर्थिक भुदंड सहन करावा लागतो.रावेर ग्रामीण रुग्णालयात गेल्या सहा महीन्या पासुन वैदयकिय अधिकारी नसल्याने प्रत्येक दिवशी रुग्णाचे अत्यंत हाल होत आहे रावेर तालुक्यात होणारे घात अपघात , तसेच इतर प्रत्येक बाब जसे विषप्राशन , सर्पदंश, उष्माघात , तसेच जेष्ठ नागरिक यांच्या वयाचा दाखला , शवविच्छेदन , पोलीस स्टेशन मधील आरोपी यांचे मेडीकल करणे अश्या बरेचश्या बाबी आहेत त्यावर रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार ,जिल्हा सिविल सर्जन डॉ. किरण पाटील तसेच सर्व विभागाशी संबधीत अधिकारी यांना ही बाब कळत नसेल का माझ्या सारख्या सर्वसामान्य पत्रकार ही बातमी, सोशल मिडीयाच्या,इमेल, फोन व्दारे राज्याचे मुख्यमंत्रीं, आरोग्य मंत्री, पालकमंत्री, आमदार , एक दिवस काही तास प्रभारीपदी असलेले वैद्यकिय अधिकारी डॉ योगेश राणे सर , यांना इमेल द्वारे काळवून मी दि 18/5/2022 रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता परंतु रावेर पोलीस स्टेशनचे पी आय कैलाश नांगरे साहेब यांच्या विनंती व चर्चे नंतर मी तुर्तास उपोषण मागे घेतले मला वाटते सर्व पक्षाचे मान्यवर नेते ज्यांचे वजन हे सर्व ठिकाणी व्यवस्थीत पणे वापरत असतात पंरतु रावेर रूग्णालयासाठी परमानंट डॉ. का आणु शकत नाहीत? हा प्रश्न पडतोय मी जवाबदारी ने वतव्य करतोय माझी रावेर तालुक्यातील जनता भाबळी आहे त्यांना आपला हक्क घेण्याची सवय नाहीच फक्त प्रत्येक पक्ष व नेते त्यांचा फक्त वापर करीत आले आहे दि. 17 मे वार मंगळवार सकाळी 10 ते 1 1 च्या दरम्यान रावेर ग्रामीण रुग्णालय येथील घटना ऐनपुर शिवारात एक शेत मजुर केळीची बिजवाई काढण्याचे काम करीव असतांना त्यास सर्पदंश झाला उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णालय येथे आणला असता डॉक्टरच नसल्याने त्यास फक्त नार्मल प्रथमोचार करीत 108 ने जळगाव पाठविण्यात आले हा मजुर अत्यंत गरीब परिवारातील होता त्यांचा जळगाव येथे मुत्यु झाला मला वाटते त्या दिवशी रावेर येथे सक्षम वैद्यकीय अधिकारी असता तर त्या व्यक्तीचे प्राण वाचले असते अश्या घटना प्रत्येक दिवशी होत आहेत यांची वाचा फुटतही नाही. बऱ्याच पत्रकार बांधव यांना पण ही घटना माहिती नाही मला वाटत सहा महिन्या पासुन डॉ नसल्याने रावेर ग्रामीण रुग्णालय यात दोषी कोण जिल्हा सिव्हील सर्जन किंवा यात संबधीत अधिकारी वर्ग आरोग्य प्रशासन यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होवु नये अस मला वाटते रावेर येथे डॉ. का येत नाहीत न्हावी सारखे बऱ्याच ठिकाणी तीन तीन डॉक्टर कार्यरत होते मागील काळात आणि ओपीडी ही आठ ते दहा असायची आज एक लाखापासुन दिड लाख रुपया पेक्षा जास्त पगार घेणारे डॉ. कोणते रुग्ण सेवेच कार्य करतात राज्य प्रशासन यावर एवढा पगार देवुन आपली जवाबदारी वैद्यकिय अधिकारी करीत नसतील तर सरळ त्यांनी राजीनामा द्यावा यावर नक्कीच प्रतिक्रिया लिहा तुमची मी पुढील दोन ते तीन दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास बेमुदत उपोषणास बसणार आहे : एक सर्व सामान्य पत्रकार तुमच्या माझ्या हक्कासाठी नेहमी लिहीत राहील.अशा प्रकारे त्यांनी त्यांचे म्हणणे सोशल मिडीयाच्या माध्यमातून मांडले आहे व इतरांनीही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्या असे त्यांनी त्यात म्हटले आहे .