Home नंदुरबार दुकानांचे शटर उचकावून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश...

दुकानांचे शटर उचकावून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश राज्यात जावून ठोकल्या बेड्या, तीन आरोपीतांसह 1 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करुन 15 गुन्हे उघड

159

 

जिल्हा प्रतिनीधी जीवन माळी नंदूरबार

नंदूरबार- मागील काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, सारगखेडा व म्हसावद पोलीस ठाणे हडीतील ग्रामीण भागात असलेल्या दुकानांचे शटर उचकावून चोरोच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नागरिक दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. म्हणून मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत अशा पध्दतीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, सारंगखेड़ा व म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत शटर उचकावून चोरीचे गुन्हे दाखल असून ते गुन्हे अद्यापही उघडकिस आलेले नव्हते. पोलीसांसमोर देखील चोरट्यांना जेरबंद करून घडलेले गुन्हे उघडकिस आणणे हे मोठे आवाहन होते.

पी आर पाटील
पोलीस अधीक्षक नंदुरबार

त्याअनुषंगाने ग्रामीण भागातील चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करून गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिका-यांना दिले.
• वरिष्ठांच्या वरील सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, सारंगखेडा व म्हसावद पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या चोरीच्या पध्दतीचा अभ्यास करून वारंवार चोरी होणारे ठिकाण, चोरीची पध्द्त यांची इत्थंभूत माहिती घेवून रेकॉर्डवरील, मालमत्तेविरुद्ध्या गुन्ह्यातील जेलमधुन सुटुन आलेल्या गुन्हेगारांवर पाळत ठेवून होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत देखील माहिती काढत होते.

रवींद्र कळमकर
पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेशन शाखा नंदुरबार

त्यातच दि. 03/05/2022 रोजी सकाळी 05/30 वाजे दरम्यान मंदाणा ता. शहादा येथील अंगणातून मोटार सायकल तसेच साक्षीदार यांचे कापड दुकानातील व मेडीकलमधील कपडे रोख रुपये, शिवाजी नगर मंदाणा येथील घरातील रोख रुपये सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल कोणीतरी 25 ते 30 वर्ष वयोगटातील इसमांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करून घरफोडी केली म्हणून अमोल शालोग्राम साळुंखे य 35 धंदा शेती रा शिवाजी नगर ता. शहादा जि. नंदुरबार यांनी शहादा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्याने शहादा पोलीस ठाणे गु.र.नं. 278/2022 भा.द.वि. कलम 379, 380, 457, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, दिनांक 03/05/2022 रोजी शहादा तालुक्यातील मंदाणा गावात एकाच रात्रीतून दोन दुकानांचे शटर उचकावून चोरी, एक मोटर सायकल चोरी, एका घराचा कुलुप तोडुन चोरी करणे अशी घटना घडली. सदर गोष्टीची मा.पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली. तसेच सदरची घटना म्हणजे पोलीसांना चोरट्यांकडून एक प्रकारे जणू आव्हानच होते.

दिनांक 17/05/2022 रोजी मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा म्हसावद व सारंगखेडा परीसरातील दुकानांचे शटर उचकावून चोरी करणारी टोळी ही नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या बडवानी जिल्ह्यातील कालाखेत व धार जिल्ह्यातील डोंगराळ भागातील आहे. मा.पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सदरची बातमी स्थानिक गुन्हे शाखेला सांगून स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ मध्य प्रदेश राज्यातील बडवानी येथे गेले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यातील पाटी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बोकराटा, आमली, कालाखेत, गोलपाटीबैडी इत्यादी गावांच्या पाड्या पाड्यांवर स्थानिक पोलीसांच्या मदतीने जावून येथे 3 ते 4 दिवस मुक्काम करून मिळालेल्या बातमीमधील संशयीत इसमांच्या घराच्या परीसरात वेषांतर करून माहिती प्राप्त केली असता मिळालेली माहिती खात्रीशिर असलेबाबत समजले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी एकाच वेळी तिन्ही संशयीत आरोपीतांच्या घरी धाड टाकुन तिन्ही संशयीत आरोपीतांना ताब्यात घेणेबाबत नियोजन केले. त्याप्रमाणे दिनांक 19/04/2022 रोजी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या अंधारात डोंगर दन्यांमधून सतत 16 कि.मी. पायपोट करुन एकाच वेळी न्हावड्या फळी, बोकराटा येथील संशवीतांच्या घरी अचानक छापा टाकुन त्यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेले 1) तुकाराम मास्तरीया वास्कले (बवेलका) वय-24 2) संना रामसिंग वास्कले (बालका) वय 44 3) समदर रामसिंग वास्कले सर्व रा. मु. न्हावड्या फळी, कालाखेत पोस्ट बोकराटा ता, पाटी जि. बडवानी म.प्र. असे सांगितले ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेत आणुन विचारपुस केली असता, तुकाराम वास्कले याचे वडील बडवानी जिल्हा कारागृहात खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असतांना संना व समदार यांची ओळख मध्य प्रदेश राज्यातीलच धार जिल्ह्यातील 1 ) नवलसिंग 2) धरमसिंग 3) नोरद्या 4) रायसिंग यांच्याशी झाली. कालांतराने तुकाराम वास्कले याचे वडील शिक्षा पूर्ण भोगून घरी आल्यानंतर 1) नवलसिंग 2) धरमसिंग 3) नोरया 4) रायसिंग हे समदर वास्कले यांच्या मदतीने मागील 9 ते 10 महिन्यात त्यांनी शहादा, म्हसावद, सारंगखेडा हद्दीतील छोट्या छोट्या गावांमध्ये शटर उचकावून चोरी व मोटर सायकल चोरीचे खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली.

बरीलप्रमाणे शहादा, म्हसावद, सारंगखेडा पोलीस ठाण्यांचा गुन्हे अभिलेखावरील 9 घरफोडी व 6 मोटर सायकल चोरी असे एकुण 15 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही आरोपीतांना चोरी केलेल्या गुन्ह्यांमधील मुद्देमालाबाबत विचारपुस
केली असता दिनांक 03/05/2022 रोजीच्या मंदाणा येथील चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमालापैकी 35,000/- रु. कि. एक हिरो कपनीची आय स्मार्ट स्प्लेंडर मोटर सायकल, 30 हजार रुपये किमंतीची एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल, वडाळी, सारंगखेडा येथील मोबाईल दुकानाच्या चोरीतील 27 हजार 477 हजार रुपये किमतीचे 6 मोबाईल 5700/- रु.किं.च्या 5 साड्या, 2600 रु. रोख असा एकुण 1 लाख 777/
रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आला आहे.तसेच चोरी केलेल्या गुन्ह्यांमधील चोरी केलेले सोने चांदीचे दागिने व मोटर सायकल बाबत विचारपुस केली असता त्यांनी 1 ) नवलसिंग भिल 2) धरमसिंग भिल 3) नोरघा 4) रायसिंग सर्व रा. कुक्षी जि. धार मध्य प्रदेश यांचेकडे असल्याचे सांगितले. लवकरच वरील चारही आरोपीतांना ताब्यात घेवून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील, मा.पोलीस अधिक्षक श्री. विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक मोहन ढमढेर, पोलीस कॉन्सटेबल विजय ढिवरे, दिपक न्हावी, अभिमन्यु गावीत, शोएब शेख, रमेश साळुंखे तसेच पाटी पोलीस ठाण्याचे ASI / केशव यादव, पोलीस हवालदार बलविरसिंग मंडलोई यांच्या पथकाने केली आहे.