Home नंदुरबार शेतजमीन व दागिने लोभापायी बहिणीला जिवेठार मारणाऱ्या भावाला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या...

शेतजमीन व दागिने लोभापायी बहिणीला जिवेठार मारणाऱ्या भावाला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

196

 

प्रतिनीधी जीवन माळी नंदूरबार

साकुबाई सुपड्या वळवी वय 65 रा. निजामपुर ता. नवापुर या पतीच्या निधनानंतर एकट्याच शती करून आपला उदरनिर्वाह करत होते. घरात कोणीही सांभाळ करणारे नसल्यामुळे साकुबाई अत्यंत हालाखीचे जीवन जगत होते. गावात त्यांचा फक्त भाऊ होता तो देखील साकुबाई यांचा सांभाळ करण्यास तयार नव्हता, तरी देखील साकुबाई शेतीत मोलमजुरी करून आयुष्याची गाडी पुढे ढकलत होत्या, दिनांक 23/02/2022 रोजी साकुबाई वळवी अचानक बेपत्ता झाल्याने त्यांचा भाऊ पोसल्या नोगऱ्या वळवी वय 55 रा. निजामपुर ता. नवापुर यांनी विसरवाडी पोलीस ठाणे येथे मिसिंग दाखल केली होती. विसरवाडी पोलीस ठाण्याच्या पथकांनी व भाऊ पोसल्या यांनी साकुबाई वळवी यांचा नातेवाईक व इतर ठिकाणी सर्वत्र शोध घेतला परंतु त्या मिळून येत नव्हत्या, दिनांक 18/05/2022 रोजी सकाळी 11.00 वाजेच्या सुमारास विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील निजामपुर गावाचे शिवारात असलेल्या कोरड्या नाल्यात सुती गोणपाटाला दोरी बांधलेले असून त्यातून दुर्गंधी येत असल्याची प्राथमीक माहिती स्थानिक गावकऱ्यांनी विसरवाडी पोलीस ठाण्याला कळविली. विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. नितीन पाटील व पोलीस अमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले नाल्यातील गोणपाटची दोरी सोडून पाहिले असता त्यात कुजलेले मानवी प्रेताची कवटो व हाडे असून जांभळ्या व केशरी रंगाचे लुगडे व लालसर रंगाचे ब्लाऊज दिसले. सदरची माहिती समजताच मा.पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील व इतर वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पी आर पाटील
पोलीस अधीक्षक नंदुरबार

गोणपाटात मिळून आलेले कुजलेले महिलेचे प्रेत कोणाचे ? तिला कोणी व का मारले असावे ? असे अनेक आव्हान पोलीसांसमोर होते. पोसल्या नोगया वळवी यांना सदर बातमी कळताच ते देखील घटनास्थळी गेले व घटनास्थळावर मिळून आलेल्या कपड्यांवरून त्यांनी ते प्रेत त्याची बहिण साकुवाई सुपड्या वळवी हीचे असल्याचे ओळखले. मयताची ओळख जरी पटली तरी तीस मारण्याचा उद्देश काय ? मारेकरी कोण ? असे आव्हान अजूनही पोलीसांसमोर होतेच,
घडलेला प्रकार हा निश्चितच घातपाताचा असावा हे समजण्यास पोलीसांना वेळ लागला नाही.
घटनास्थळाची पाहणी करून मा.पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांनी विसरवाडी पोलीस ठाण्याचेसहा. पोलीस निरीक्षक श्री. नितीन पाटील यांना खूनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करणेबाबत आदेशीत केल्याने पोलीस उप निरीक्षक भूषण विनायक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीताविरुध्द् खून करून पुरावा नष्ट केल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला होता. घडलेला प्रकार हा अत्यंत गंभीर व संवेदनशील होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीसअधीक्षक श्री. पो. आर. पाटील, मा, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर व विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे पथक तयार करुन आरोपी तात्काळ ताब्यात घेऊन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे मार्गदर्शन केले.

रवींद्र कळमकर
पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेशन शाखा नंदुरबार

घटनास्थळावर आरोपी शोधण्यास मदत होवू शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे, मोबाईल, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तू मिळून आलेली नव्हती. ग्रामीण भाग असल्यामुळे सी.सी.टी.व्ही. चा प्रश्नच येत नव्हता त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व विसरवाडी पोलीस ठाण्याच्या अमंलदारांचे मिळून वेगवेगळे 4 पथके तयार करून पथक तपासासाठी रवाना करण्यात आले. दिनांक 20/05/2022 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुमारे 2 ते 3 महिन्यापूर्वी मयत साकुबाई हिचा भाऊ पोसल्या वळवी हा नंदुरबार येथे चांदीचे दागिने विकण्यासाठी आला होता. मिळालेली बातमी अतिशय त्रोटक होती, मा. पोलीस अधीक्षक श्री पी. आर. पाटील यांनी सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांना सांगितली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ मयत साकुबाई हिचा भाऊ पोसल्या वळवी यास ताब्यात घेणेसाठी पाठविले. मिळालेल्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निजामपुर ता. नवापुर येथून पोसल्या वळवी यास ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास विचारपुस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी संशयोतास अत्यंत कोशल्यपूर्वक विचारपुस करुन संशयीताच्या त्याच्या विसंगत बाबी निदर्शनास आणून दिल्या व संशयीत आरोपी पोसल्या बळवी यास बोलते करुन घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली.
ताब्यात घेण्यात आलेला संशयीत आरोपी पोसल्या बळवी याने अतिशय धक्कादायक माहिती सांगितली को, मयत साकुबाई ही पोसल्या वळवी याची मोठी बहिण होती. तिला पती, मुल-बाळ वगैरे नव्हते. तसेच संशयीत पोसल्या वळवी याची पत्नी सतत आजारी असल्यामुळे तिच्या औषोधोपचारासाठी त्यास पैश्यांची आवश्यकता असायचो, तसेच संशयीत पोसल्या व मयत साकुबाई यांच्या जमीनीच्या हिस्स्यावरून बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु होता. सुमारे 2 ते 3 महिन्यापूर्वी मयत साकुबाई हिस रात्रीच्या वेळी तिच्या घरात जिवेठार मारुन एका गोणपाटात टाकले व ते गोणपाट त्याने त्याच्या घरी आणून ठेवून हें दिले. तसेच तिच्या अंगावरील दागीने हे नंदुरबार येथील सोनारास विकल्याचे सांगितले.

काही दिवसानंतर प्रेताचा वास जास्त येत असल्यामुळे आरोपी याने ते प्रेत गावाच्या लगत असलेल्या कोरड्या नाल्यात टाकून दिले, अशा आशयाची माहिती दिली. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील, मा. अपर पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. विजय पवार, मा. उप विभागीय पोलीस अधीकारी, नंदुरबार श्री. सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर, सहा पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी, पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे, महेंद्र नगराळे, विनोद जाधव, राकेश वसावे, पोलीस नाईक दादाभाई मासुळ, बापू बागुल, जितेंद्र ठाकुर, जितेंद्र तोरवणे, जितेंद्र अहिरराव, सुनिल पाडवी, पोलीस कॉन्सटेबल आनंदा मराठे, राजेंद्र काटके, अभिमन्यु गावीत, तुषार पाटील यांच्या पथकाने केली आहे.