Home वाशिम अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्ष कारावासाची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्ष कारावासाची शिक्षा

251

 

वाशिम:-पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे दिनांक ३१/०८/२०१७ रोजी फिर्यादी नामे सौ. सुनिता गणेश शिंदे वय ४० वर्ष रा. गोलवाडी ता. मंगरुळपीर जि. वाशिम हिने फिर्यादी दिली की, गुन्हयातील फिर्यादीची मुलगी पिडीत हीस आरोपी नामे प्रकाश लालसिंग चव्हाण रा.गोलवाडी ता. मंगरूळपीर याने पकडून शेताजवळील नाल्यात नेवून तिच्या सोबत जबरदस्ती करुन लघवी करायचे जागेत त्याची सु करायची जागा टाकली असा प्रकार आरोपीने ३ वेळा केल्याने फिर्यादीचे मुलीस गर्भधारणा झली तसेच कोणाला काही सांगीतल्यास जिवाने मारण्याची धमकी दिली अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचे तत्कालीन तपास अधिकारी पो. उप.नि. असद खाँ पठाण व त्यांचे लेखनिक पो.कॉ. विनोद चित्तकवार ब.नं ७९३ व पो.कॉ. सुनिल गंडाईत ब. नं. २८३ यांनी गुन्हयाचा सखोल साक्षी पुराव्यासह तपास करून गुन्हयाचे दोषारोप पत्र क्र १०५/२०१७ दिनांक २३/११/२०१७ अन्वये मा. सत्र न्यायालय वाशिम येथे दाखल केले. गुन्हयाचा सि.सि. नं. स्पेशल चाईल्ड केस नं. १८/२०१७ असा आहे.सदर गुन्हयाचा कोर्ट केस नं. १८/२०१७ चा खटला जिल्हा व सत्र न्यायालय मंगरुळपीर येथे मा. न्यायाधिश रचना आर. तेहरा मॅडम यांच्या समक्ष दिनांक २३/०५/२०२२ पावेतो चालला मा. न्यायाधिश तेहरा मॅडम यांनी दोन्ही पक्षाची बाजू एकून घेवून आरोपी प्रकाश लालसिंग चव्हाण रा गोलवाडी ता. मंगरुळपीर यास १० वर्ष शिक्षा व ५०००रु. दंड व दंड न भरल्यास ६ महीने कारावास अशा प्रकारे शिक्षा सुनावलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पो.उप.नि. असद खाँ पठाण व त्यांचे लेखनिक यांनी योग्य रित्या करुन गुन्हयातील फिर्यादीस न्याय मिळवून दिला.सदर प्रकरणी सरकार तर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अँड श्री. पी. एस. ढोबळे यांनी काम पाहीले. तर मा.पोलीस अधिक्षक बच्चनसिंह, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे,पोलीस निरीक्षक सुनिल हूड, यांच्या मार्गदर्शनात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून ना.पो.कॉ. गप्फुर पप्पुवाले ब. नं. ११८३ यांनी कामकाज पाहीले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206