रुस्तम शेख कळंब तालुका प्रतिनिधी :-
या वर्षी कापुस पिकाचा पेरा वाढणार असल्याने आणि येणाऱ्या हंगामात कापुस पिकाचे नियोजन, कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यावे , गुलाबी बोंड अळीचे नियोजन कसे करावे याबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने तालुक्यातील आष्टी ,सावरगाव या गावां मध्ये रॅलिज इंडिया लि अर्तंगत टाटा धान्य सिडस वतीने भारुड च्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
तसेच तालुक्यात ग्रामीण भागात विविध ठिकाणी भारुड च्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम आयोगीत करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन रॅलिज इंडिया लि अर्तंगत टाटा धान्य सीड्स वतीने करण्यात येत आहे .या जनजागृती कार्यक्रमां मध्ये बहुसंख्य शेतकरी सहभागी होऊन मार्गदर्शनचा लाभ घेत आहे