Home वाशिम बंजारा समाजाला राज्य सभेचे नेतृत्व मिळावे – महंत सुनील महाराज, पोहरागड

बंजारा समाजाला राज्य सभेचे नेतृत्व मिळावे – महंत सुनील महाराज, पोहरागड

228
भारत देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील लोकसभा व राज्यसभेची भव्य-दिव्य वास्तू व संपुर्ण परिसर हे क्रांतीकारी दानशुर लकिशा बंजारा जननायक यांनी देशासाठी अर्पण केलेली असतांनी बंजारा समाजातील लायक व्यक्ती ला आज पर्यंत राज्यसभेवर नेतृत्व करण्याची संधी कुठल्याही राष्ट्रीय पक्षांनी आज पर्यंत ही संधी दिली नाही, भारत देशात बंजारा लोकसंख्या १४ ते १५ करोड़ व महाराष्ट्रात १ कोटीच्या वर असून बंजारा समाजाला आज पर्यंत राजकिय पार्टीने आश्वासन देवून हातावर तुरी देण्याचे काम सर्वच राष्ट्रीय पक्षांनी केलेला आहे, ही बाब लक्षात घेवून, बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र *पोहरादेवी* येथील महंत मंडळींनी एकमुखाने निर्णय घेवून समाजाच्या उत्थानासाठी हा म्हत्वाचं निर्णय घेवून, पोहरादेवी येथीलच किंवा एखाद्या लायक उमेदवारांची निवड करून राज्यसभेवर नेतृत्व करण्याची संधी ज्या राष्ट्रीय पक्षाकडून दिली जाईल, त्याच राजकीय पार्टी सोबत समाज खंबीरपणे उभे राहील,असे ठराव घेवून मुंबई व दिल्ली येथे जावून महंत सुनील महाराज, यांचे सोबत प्रा.वसंत राठोड़ सर गोर सेवा टीव्ही पुसद, याडीकार जेष्ठ साहीत्यीक पंजाब चव्हाण पुसद, यांचेसह कार्यकर्ता मंडळी यांनी सर्व राजकिय पक्ष प्रमुखांची भेट घेवून खलबत सुरू केले असल्याचे न्युज टीव्ही चैनल वर, शोशल मिडियावर झळकत आहे, तरी सर्व राजकीय पक्षात काम करणार्या लोकप्रतिनिधिनी एकवट होवून या उच्चकोटी निर्णयाला दुजोरा देवून सक्रिय असलेल्या या टीमला सर्व सहमती दर्शवावे असे आवाहन मोहन जाधव जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद, यवतमाळ जिल्हा यांनी आपल्या प्रसिद्धि पत्रकातून केले आहे.