Home यवतमाळ डॉ. निरज वाघमारे यांच्या उपोषणा पुढे भूमी अभिलेख नमले

डॉ. निरज वाघमारे यांच्या उपोषणा पुढे भूमी अभिलेख नमले

281

३० मे ला जागेची मोजणी होणार सुरु, लेखी आश्वानानंतर आंदोलन मागे…!

यवतमाळ ( प्रति ) नेताजी नगर परिसरातील रहिवाशांना जमिनीच्या हक्कपट्टा मोजणीचे प्रलंबित प्रकरणी डॉ.निरज वाघमारे यांनी आरंभीलेल्या उपोषण आंदोलनाची यशस्वी सांगता झाली असुन सोमवार दिनांक ३० मे २०२२ नंतर स्थानिक भुमिअभिलेख खाते प्रत्यक्ष मोजणी करणार असल्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने सदरचे आंदोलन मागे घेत असलो तरी यापुढेही भ्रष्ट कारभाराविरुध्द समाजाच्या भल्यासाठी अविरतपणे संघर्षशील राहण्याचा प्रयत्न सुरुच राहील अशी प्रतिक्रिया डॉ. निरज वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या २४ मे पासून डॉ. निरज वाघमारे यांनी उपरोक्त प्रकरणी आमरण उपोषणाला प्रारंभ करुन या प्रलंबीत प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. दरम्यान शहरातील राजकीय पक्ष व संस्था संघटनांनी या जनहितकारी आंदोलनास पाठिंबा देऊन हा लढा अधिक मजबुत केला. त्यामुळेच संबंधित भुमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी यांना वरिष्ठ पातळीवरून धारेवर धरण्यात आले. परिणामी स्थानिक पातळीवरील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली चालढकल उघडकीस आली. या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष देत प्रकरण चर्चेने सोडविण्याबाबत आंदोलकांशी वाटाघाटी केल्यात.
मुख्याधिकारी न.प. द्वारा भरण्यात येणारा मोजणी फी चा ५० टक्के हिस्सा डॉ. निरज वाघमारे यांनी भरण्याची तयारी दर्शविली असुन ३० मे २०२२ पासुन मोजणीचे काम सुरू करण्यात येईल. असे लेखी आश्वासन डॉ. निरज वाघमारे यांना देण्यात आल्याने आपले हे आंदोलन तुर्तास मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनाला समाजातील प्रतिष्ठित मान्यवर आणि वंचित बहुजन आघाडीसह विवीध पक्ष व संस्था संघटनांनी पाठिंबा दिला. तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोक डेरे यांनी वाघमारे समवेत उपोषणात सहभाग नोंदविला. त्या सर्वांप्रती आभार प्रकट करुन त्यांनी अखेर आपले उपोषण सोडल्याचे जाहीर केले..

चौकट….
समाजावर होणाऱ्या कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा हा समाजच देत असतो. समाज भक्कमपणे लढवैय्यांच्या पाठीशी उभा असतो. समाजातील संस्था संघटना प्रसारमाध्यमे व पत्रकार बांधव आणि राजकीय पक्ष सत्याच्या बाजूने आपोआपच येतात हेच आमच्या आंदोलनाच्या यशाचे गमक आहे. म्हणुनच माझ्या बाजुने समाज उभा राहिला. वंचित बहुजन आघाडीसह अनेक मान्यवर,संस्था संघटना सोबत आल्यात. हे सर्व वातावरण बलदायी आणि फलदायी असेच होते अशी प्रतिक्रिया डॉ. निरज वाघमारे यांनी व्यक्त करतांना सर्वांचे आभार मानले.