सुशांत आगे – पुणे
बीड जिल्हयातील 28 पोलिस स्टेशन मधील पोक्सो अंतर्गत गुन्हयातील तपास पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, पिंक मोबाईल पथक यांचे 27 व 28 मे 2022 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय येथे कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन नवी दिल्ली व सरस्वती सेवाभावी संस्था, भाटवडगाव ता. माजलगाव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झालेले आहे.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रम हा मा.पोलीस अधिक्षक मा. पंकज देशमुख, जिल्हाविधी प्राधिकरण चे प्रभारी सदस्य सचिव न्यायमूर्ती के. यु. तेलगांवकर तसेच कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन चे कार्यकारी संचालक मा. विधानचंद्र सिंग व सरस्वती संस्थेचे सचिव रमेश कुटे यांचे संयुक्त मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण झालेले आहे.
उदघाटनपर बोलताना न्यायमूर्ती मा.तेलगावकर यांनी बाल लैगिक अत्याचार कायद्यानुसार योग्य तपास करून पुरावे सादर केल्यास समाजातील अपवृत्ती कमी होतील त्याच प्रमाणे पोलीस उपअधीक्षक मा. प्रसाद परोपकारी यांनी सांगितले की अशाप्रकारचे पोलीसांना प्रशिक्षण वारंवार मिळणे काळाची गरज निर्माण झाली आहे,
यासाठी नामवंत दिल्ली येथील प्रशिक्षक मा. रिशा सय्यद, राष्ट्रपती पदक विजेते, मा. आर. पी. सिंग यांनी पोस्को कायदया संदर्भातील सविस्तर मार्गदर्शन केले, या प्रशिक्षना करिता उपपोलीस अधीक्षक कार्यालय बीड मा. संतोष वाळके, बाल कल्याण समिती चे अध्यक्ष डॉ.अभय वणवे, सदस्य मा.तत्वशील कांबळे, जिल्हा बाल संरक्षण पयर्वेक्षक मा.निर्मळ सर, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण पार पाडण्यासाठी पोलीस निरीशक मा.शेषराव उदार सर यांनी पोलीस अधिक्षक यांचे मागदर्शनानुसार पार पाडले.
या प्रशिक्षणास आलेल्या मान्यवरांचे आभार सरस्वती संस्थेचे श्री प्रल्हाद कुटे, यांनी मांडले. प्रशिक्षण काळात ज्ञानेश्वर हनवते , जयदिप कुंभार, रामदास गायकवाड, सतिष चोपडे, सपोर्ट पर्सन सारिका यादव व अँड. महेश कुंभार यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.