Home यवतमाळ घाटंजी येथील भुमी अभिलेख कार्यालयात कार्यरत सलीम तगाले व त्यांच्या पत्नी 10...

घाटंजी येथील भुमी अभिलेख कार्यालयात कार्यरत सलीम तगाले व त्यांच्या पत्नी 10 जुन रोजी हज करिता रवाना होणार..!

204
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी : सन 2019 पासून कोविड – कोरोना मुळे सव॔ देशावर परीणाम झाल्या मूळे तसेच लाकॅडाउन असल्यामुळे सतत दोन वर्ष हज यात्रा बंद होती. पंरतू मुंबई येथील हज कमेटीने सौदी अरेबिया सरकार कडे 2022 साला करिता हज यात्रे करीता मंजुरी प्राप्त करून घेतली. हज यात्रेकरीता जाणाऱ्यांना हज 2022 साला करीता एप्रिल अखेर फाँर्म भरण्याची विनंती केली. सोबत कोरोनाचे दोन्ही डोजचे प्रमाणपत्र, 65 वर्षा आतील पासपोर्ट आदी कागदपत्रा बाबत माहिती दिली. या वेळी यवतमाल जिल्ह्यातील 105 मुस्लिम बांधव हज करीता रवाना होणार असून त्यांना सौदी अरेबिया सरकार कडुन मजूंरी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे हाजीब शकरबार नरहड फाउंडेशन ग्रुप् राजस्थान यवतमाल शाखेचे अध्यक्ष, गोल्डन पार्क येथील ख्वाजा गरीब नवाज मस्जिद कमेटीचे सदस्य, भुमि अभिलेख कार्यालयातील सेवानिवृत्त उपअधिक्षक सलीम इब्राहीम तगाले (बाळापूर) व त्यांच्या सुवैद्य पत्नी सौ. तगाले हे हज यात्रेला जात असल्याने त्यांचा घाटंजी तालुक्यातील कूर्ली येथे सोमवारी मोबिन कमरुद्दीन सोलंकी यांच्या मुलीच्या विवाहा प्रसंगी भुमि अभिलेख कार्यालयातील सेवानिवृत्त उप अधिक्षक सलीम इब्राहीम तगाले यांचा जामा मस्जीद ट्रस्ट कमेटीचे माजी अध्यक्ष मोबीन कमरुद्दीन सोलंकी व पत्रकार अयनुद्दीन सोलंकी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी पाटणबोरी येथील दारुल ऊलुम तालीमुल कुरआँन मदरसाचे नाजीम व जामा मस्जीदचे ईमाम हजरत मौलाना अलहाज शेख अय्युब ईशाती या सह आदिलाबाद, आर्णी, किनवट, यवतमाळ, पांढरकवडा, घाटंजी, माहुर, दिग्रस, दारव्हा, पुसद आदी तालुक्यासह विदर्भातील मुस्लिम तेली समाजाचे स्री, पुरुष आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन बशीर सोलंकी यांनी केले. तर आभार खालीद बरकत तगाले यांनी मानले.