Home यवतमाळ राजपूत समाज बहुउद्देश्यीय संस्थेच्या वतीने 482 वी महाराणा प्रताप जयंती साजरी होणार

राजपूत समाज बहुउद्देश्यीय संस्थेच्या वतीने 482 वी महाराणा प्रताप जयंती साजरी होणार

199

 

यवतमाळ , दि. 1 :- यवतमाळ येथील राजपूत समाज बहुउद्देशीय संस्था र. नं. 2000/3 यवतमाळ द्वारा दरवर्षी हिन्दुसूर्य सम्राट महाराणा प्रतापसिंह यांचा जन्मोत्सव साजरा करीत आहे.
जन्मोत्सवाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन दि. 22 जून 2022 पासून 2 जून 2022 पर्यंत करण्यात आले. या जन्मोत्सवाची सांगता दि. 2 जून 2022 रोजी श्री. महाराणा प्रताप यांच्या जयंती दिनी करण्याचे ठरले आहे. तेव्हा राजपूत समाजासह हिन्दू बाँधवानी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन राजपूत समाज बहुउद्देश्यीय संस्थेद्वारे करण्यात येत आहे.
श्री. महाराणा प्रतापसिंहजी ह्यांच्या 482 व्या जयंती निमित्य गुरुवार दी. 2 जून 2022 रोजी सकाळी 8.30 वाजता भव्य मोटरसाइकिल रैली दुर्गामाता मंदिर, आठवडी बाजार येथून सुरु होऊन यवतमाळ शहरातील विविध मार्गक्रम करीत विश्वभारती विद्या मंदिर, वाघापुर येथे समापन होईल, तथपश्चात ‘वृक्ष है तो जीवन है’ ह्या विचाराने वृक्षारोपण प्रेरित होऊन मोक्षधाम पांढरकवड़ा रोड, यवतमाळ येथे सम्पन्न होईल.
त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता उत्सव मंगल कार्यालय यवतमाळ येथे समस्त समाज बंधवाच्या उपस्थितीत सांकृतिक कार्यक्रम तथा समाजाच्या अधिकृत वेबसाईड चे विमोचन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल असे आयोजकानी कळविले आहे.