राळेगाव :– राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथे जागतिक तंबाखू विरोधी दिन दिनांक 31 मे 2022 रोजी साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील एन सी सी विद्यार्थ्यांना तंबाखू चे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच राळेगाव शहरातुन एन सी सी विद्यार्थ्यांनी रॅली काढून, घोषणा देऊन लोकांना तंबाखू च्या दुष्परिणाम बाबतीत जागृत करण्यात आले. यावेळी एन सी सी अधिकारी. सुरेश कोवे व न्यू इंग्लिश हायस्कुल चे उपमुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे, अरुण कामनापुरे तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठया प्रमाणात यावेळी उपस्थित होते….