रावेर ( शेख शरीफ)
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील जि प उच्च प्राथमिक उर्दू शाळा फुलेनगर पाळधी, ता. धरणगाव येथील पदवीधर शिक्षक श्री मोहसीन खान अजीज खान यांना दि.29/05/2022 रोजी अल्प बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे शैक्षणिक व समाजिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ केंद्रीय कार्यालय गुरुकुंज आश्रम जि. अमरावती संचलित अधिकृत शाखा श्री गुरुदेव सेवा मंडळ जळगाव खान्देश ह्या संस्थेच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.