एका खाजगी कंपनिच्या ट्रव्हल्समध्ये क्लिनरनेच केला युवतीचा विनयभंग,वाशिम जिल्ह्यातील प्रकार
वाशिम:-औरंगाबाद येथील एका तरुणीचा प्रवासादरम्यान एका कंपनीच्या ट्रव्हल्समधील क्लिनरने विनयभंग केल्याने सबंधिताविरुध्द गुन्हा नोंदवन्यात आला आहे.खाजगी ट्रव्हल्सने प्रवास करणे आता महिलांसाठी घातक ठरत असुन प्रशासनाने अशा खाजगी ट्रव्हल्समध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविषयी आता कठोर पावले ऊचलने गरजेचे बनले आहे.
सविस्तर वृत्त असे की,फिर्यादीने दिलेल्या रिपोर्टनुसार सदर तरुणी ही दि. 30/05/2022 रोजी रात्री 11/00 वा चे सुमारास औरंगाबाद येथुन राजनांदगाव जि राज्य छत्तीसगड येथे जाण्यासाठी हंस ट्रॅव्हल्स सिलीपर कोच क्र. UP78FN7707 मध्ये सीट नं 8 मध्ये बसली होती. ट्रॅव्हल्स राञी अंदाजे 11/20 वाचे सुमारास औरंगाबाद येथुन राजनांदगाव येथे जाण्यासाठी निघाली. मध्ये राञी 03/15 वा चे सुमारास फिर्यादीच्या सीट क्र 8 वर झोपीत असतांना कोणीतरी पोटावरून छातीवरून वाईट उदेशाने हात फिरवला त्यामुळे जाग आली व ट्रॅव्हल्स मध्ये अंधुक प्रकाश होता.फिर्यादीला जाग आल्यामुळे त्या व्यक्तीला थापड़ मारली व ओरडली तेव्हा तो व्यक्ती पाठीमागे गेला तेव्हा बाजुचे सिट क्र 9 वरील काकुने फिर्यादीला सांगीतले की तो पाठी मागे असलेल्या कॅबीन मध्ये गेला आहे तो व्यक्ती कोण आहे म्हणून फिर्यादीने पाहणी केली व ट्रॅव्हल्स चालवणा-या ड्राव्हरला सदर घटने बाबत सांगीतले व तेव्हा त्यांनी गाडीतील सर्वाना चेक केले व नंतर त्यांनी ट्रॅव्हल्स मधील असलेल्या कॅबीन मध्ये असलेल्या हेलपरला आवाज दिला व तो समोर
आला तेव्हा फीर्यादी व सीट क्र 9 वरील काकुने त्याला ओळखले. ड्राव्हरला फिर्यादीने त्याचे नाव विचारायला लावले असता त्यांनी त्याचे नाव अमीत रामप्रसाद लोढा रा. रत्नागड खेडा ता. जि. रतलाम राज्य मध्येप्रदेश असे सांगीतले. सदर घटनेचे वेळी फीर्यादी झोपीत असल्यामुळे घटना नेमकी कुठे घडली निचित माहीत नाही तर गाडीचे कॅबीन मध्ये बसलेल्या एका व्यक्तीने सांगीतले की, सदर घटना ही ग्राम कुकसा फाटा ते केनवड दरम्यान पो स्टे शिरपुर हद्दीत घडली आहे असे सांगीतले. ट्रॅव्हल्स मधील हेलपर अमीत रामप्रसाद लोढा याने फिर्यादी झोपीत असतांना वाईट उद्देशाने माझे पोटावरून
व छातीवरून हातफिरवून विनयभंग केला आहे. फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा दाखल करून पो
नि सा यांचे आदेशाने तपास पो स्टे शिरपुर कडे वर्ग केला.पोलिस पुढील तपास करत आहेत.खाजगी ट्रव्हल्समध्ये प्रवास करणार्या महिलांसाठी असे धोकादायक प्रसंग ओढवत असल्यामुळे पोलिस प्रशासनाने आता यासंदर्भात कठोर पावले ऊचलन्याची मागणी होत आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206