मनिष गुडधे
अमरावती – हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी वाऱ्याचा आणि जोरदार पावसाचा मोठा फटका दर्यापूर तालुक्याला बसला आहे. या वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे दर्यापूर शहरात लग्न समारंभ असलेल्या मूर्तिजापूर मार्गावरील वैभव मंगल कार्यालयातील टीन पत्रे उडाल्याने व पडझड झाल्याने लग्नसमारंभात आलेले जवळपास 40 वऱ्हाडी जखमी झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.यापैकी चार जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सर्व जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले .पावसामुळे जोरदार फटका. अमरावतीच्या दर्यापूर शहरामध्ये आज दुपारी झालेल्या वादळ आणि पावसामुळे जोरदार फटका बसला आहे. शहरातील वैभव मंगल कार्यालयात साळुंखे व जवंजाळ या दोन परिवारातील मुलाचा आणि मुलीचा विवाह सोहळा होता. दरम्यान आज दुपारी साडेतीन वाजता आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे या मंगल कार्यालयवरील टीनपत्रे अक्षरशा उडून गेले तर मंगल कार्यालयाची पडझड झाल्यामुळे जवळपास 40 वऱ्हाडी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल..जखमी झालेल्या पाहुणे मंडळींना अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, डॉक्टर पंजाबराव देशमुख रुग्णालय तसेच अनेक खासगी रुग्णालय व दर्यापूर येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये लहान बालकाचा समावेश. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पडझड होऊन जखमी झालेल्यांमध्ये एका तीन वर्षीय बालकाचादेखील समावेश आहे. त्या जखमी बालकाला डॉक्टर पंजाबराव देशमुख रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .सुदैवाने नवरा नवरी सुरक्षित. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे लग्नसमारंभातील जवळपास चाळीस वऱ्हाडी जखमी झाली आहे .दरम्यान नवदांपत्य हे सुरक्षित असून कुठलीही सुदैवाने जीवित हानी झाली नाही.