Home यवतमाळ राजपूत समाज बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव साजरा

राजपूत समाज बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव साजरा

364

 

यवतमाळ , दि . ३ राजपूत समाज बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने दि . २ जून २०२२ रोजी विरशिरोमणी हिंदूसुर्य महारणा प्रतापसिंह जन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला . दि . २५ मे २०२२ पासून ऑनलाईन चित्रकला स्पर्धा , निबंध स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , सौभाग्यवती सौंदर्य स्पर्धा , फॅन्सी ड्रेस स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा , गीतगायन स्पर्धा तसेच नृत्य स्पर्धा ह्या सगळ्या ऑनलाईन च्या माध्यमातून घेण्यात आल्या . या स्पर्धेत २१० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता . तसेच राजपूत युवकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पण करण्यात आले होते . क्रिकेट स्पर्धेत युवा ४ संघांनी भाग घेतला होता . दि . २ जून २०२२ रोजी सकाळी ९ वाजता समस्त समाज बांधवांची शहरातून मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . ती रॅली दुर्गामाता मंदिर आठवडी बाजार यवतमाळ येथून प्रारंभ करुन ती रॅली मोक्षधाम पांढरकवडा रोड येथे जावून मोक्षधाम येथे २० वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले . तसेच प्रत्येक झाडाकरीता ट्री गार्ड पण संस्थेच्या वतीने देण्यात आले . त्यानंतर शहरातील विविध मार्गक्रमण करीत बस स्टैंड चौक येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हारार्पन करीत पुढे एलआयसी चौक , स्टेट बँक चौक , वाघापुर नाका , घापुर येथील विश्वभारती विद्या मंदिर येथील विरशिरोमणी हिंदूसुर्य महारणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचे पूजन करीत त्या ठिकाणी रॅलीचे समापन करण्यात आले . सायंकाळी ६ वाजता उत्सव मंगल कार्यालयात समस्त शहरातील मोठ्या संख्येत समाज बांधव महिला परीवारासह एकत्र येवून जन्मोत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष अ . भा . क्ष . महासभा विदर्भ अध्यक्ष श्री . राजेंद्रसिंहजी गौर नागपुर , अ . भा . क्ष . महासभा राष्ट्रीय महामंत्री श्री . पंकजसिंहजी बैस नागपुर , श्यामसिंहजी गहरवार तसेच ईश्वरसिंह सेंगर , संस्थेचे अध्यक्ष शैलेन्द्रसिंह बैस ( दालवाला ) तसेच राजपूत महिला संघटनेच्या महिला प्रमुख सौ . किरण सोमवंशी मंचकावर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्याचे भाषणानंतर विविध स्पर्धेतील विजयी झालेल्या स्पर्धकांना , प्रमाणपत्र , सन्मानचिन्ह देवून सर्वाना गौरविण्यात आले . तसेच सौ . माही अजयसिंह भदोरीया यांनी तयार केलेल्या राजपूत समाज यवतमाळ या वेबसाईडचे उद्घाटन शैलेंद्रसिंह बैस यांचे हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे संचालन सौ . विनीता राजेंद्रसिंह गौतम यांनी केले . तसेच आभार प्रदर्शन श्री . मोहनसिंह शेर यांनी केले . या कार्यक्रमाकरीता संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले . ज्वालासिंह सरसवार , राजेंद्रसिंह गौतम , योगेशसिंह चौहान , गोपालसिंह चौहान , मोहनसिंह सोमवंशी , भुपेंद्रसिंह परिहार , रणधिरसिंह बिसेन , अजयसिंह भदोरीया , हरीप्रतापसिंह सोमवंशी , चंद्रकांतसिंह सोमवंशी , अभिजीतसिंह रायकुंवर , गुलाबसिंह चौहान , सुरेशसिंह दिक्षीत , राजेंद्रसिंह परिहार , प्रदिपसिंह चंद्रवंशी , तसेच महिला मधून श्रीमती उषासिंह बेनबंशी , अश्विनीसिंह सोमवंशी , सारीकासिंह सिन्हा , पूनमसिंह गहरवार , स्नेहलसिंह सोमवंशी , भावनासिंह ठाकुर , वैशालीसिंह ठाकुर , शारदासिंह राठौर , रश्मीसिंह सोमवंशी , किरणसिंह सोमवंशी , रजनीसिंह चंदेल , ब्रिजलतासिंह चौहान , दिप्तीसिंह कछवाय , उमासिंह परदेशी , विनासिंह बिसेन , विजयश्री दालवाला तसेच युवा मधून अमरसिंह बिसेन , शुभमसिंह सोमवंशी , गगनसिंह बिसेन , कुणाल परिहार , कपील परिहार , अंकीत सोमवंशी , सुरज बिसेन , समिर ठाकुर , मुकेश राणा , अक्षय बिसेन इत्यादी बांधव उपस्थित होतें .