Home वाशिम आकाशाला गवसणी घालण्याची तरुणाईमध्ये ऊर्जा निर्माण करणारा खाकीतील प्रदिप बोडखे

आकाशाला गवसणी घालण्याची तरुणाईमध्ये ऊर्जा निर्माण करणारा खाकीतील प्रदिप बोडखे

1669

 

मोफत पोलीस प्रशिक्षण केंद्राव्दारे खाकी घडण्याची जिद्द

वाशिम:-वाशिम तालुक्यातील कृष्णा या छोट्याशा गावातुन पहिली खाकी वर्दीतला प्रदिप कैलास बोडखे या महाराष्ट पोलीस दलातील तरुणाने आपल्या जिद्द,चिकाटी आणी स्वतः सहन केलेल्या हालअपेष्टांची आठवण ठेवून इतर तरुणांच्याही अंगावर खाकी वर्दी यावी यासाठी आपले कर्तव्य बजावुन योग्य तालमीतुन घडवण्याचा चंग बांधुन व त्याप्रमाणे सातत्याने शिकवणी वर्गाव्दारे खाकीतील समाजमन जपण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असल्याने या ध्येयवेड्या खाकीतील प्रदिपला वाशिम पोलीसदलाकडुन यथोचित सन्मान करुन पुरस्कार द्यावा आणी त्यांच्या निस्वार्थी सेवेची सेवापुस्तीकेत नोंद करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.
खेडेगाव म्हटले की दारिद्र्य हे गावातील बहुतांश लोकांच्या पाचविला पुजलेले असतेच.अशाच आर्थीक परिस्थीतीने जेमतेम असलेल्या वाशिम तालुक्यातील कृष्णा या सुमारे दिड हजाराच्या आसपास लोकसंख्या असणार्‍या गावामध्ये अल्पभुधारक कुटुंबातील जेमतेम सहिपुरते शिक्षण असलेल्या आईवडील असलेल्या प्रदिप कैलास बोडखे या ध्येयवेड्या तरुणाने गावला पहिल्या खाकीचा मान मिळवुन दिला.आता या गावात १३ तरुण पोलिस विभागात आहेत.सुरुवातीला शिक्षणाचा पाहिजे तसा गंध नसलेल्या या गावात प्रदिपने खडतर परिस्थीतीतुन मार्ग काढत शिक्षण घेतले.शिकत असतांना लहानपणापासुनच खेळात रुची असलेल्या प्रदिपने पुढेही खेळाडु वृत्ती जोपासुन खेळातच करिअर करण्याचा चंग बांधला.ऊपाशीतापाशी मैदानावर पोलिस भर्तीचा सराव केला.सुमारे १०० मिटर रेंजरचा धावपटु असलेल्या प्रदिप बोडखेने राष्टीय खेळाडु म्हणून प्राविण्य मिळवले.सन २००८ साली अमरावती येथे पोलिस दलात नियुक्ती झाली.अत्यंत हलाखीच्या परिस्थीतीतुन आल्यामुळे परिस्थीतीची जाण ठेवून पोलिस दलात इमाने इतबारे कर्तव्य बजावले.पुढे २०१२ पासुन मैदानी प्रक्टीस सुरु करुन तरुणांसाठीही मोफत प्रशिक्षणास सुरुवात केली.२०१४ मध्ये वाशिम येथे पोलिस दलात बदली झाल्यानंतर परिस्थीतिशी हताश झालेल्या तरुणांमध्ये नवचैतन्य यावे आणी खेळातुन आपली प्रगती साधुन आपले करिअर घडवावे यासाठी तरुणांकरता मोफत शिकवणी वर्ग आणी मैदानी सरावाची सुरुवात केली.या सेवाभावी कार्याला अनेक तरुणांनी चांगला प्रतिसाद देत आपले करिअर घडवण्यासाठी प्रदिपच्या तालमित घडायला सुरुवात केली.आतापर्यत मोफत पोलिस प्रशिक्षणातुन दिडशेच्या वर तरुणांनी पोलीस,आर्मी आदी विविध क्षेञात नोकरी मिळवली.नोकरी मीळवणारे तरुण आजही प्रदिप बोडखेच्या त्या ॠणाला आठवत असुन आपल्या करिअर गुरुचा अभिमान आवर्जुन व्यक्त करतात.अनेक तरुण आजही परिस्थीतीमुळे पुढे हवं ते शिक्षण घेवू शकत नाहीत आणी हताश होवून त्यांच्या जिवनात नैराश्य निर्माण होते.परंतु परिस्थीतीशी दोन हात करत खेळामध्ये प्राविण्य प्राप्त करुनही आपण खंबिरपणे ऊभे राहुन जिवन घडवू शकतो यांचे स्वतः ऊत्तम ऊदाहरण असलेल्या प्रदिप बोडखे यांनी समस्त तरुणाईला एक आदर्श निर्माण करत परिस्थीतीशी दोन हात करा आणी आपले भविष्य घडवा असा मोलाचा संदेश दिला आहे.खेळामध्येही करिअर घडु शकते त्यामुळे रुची असलेल्या खेळात प्राविण्य मिळवुनही नोकरीचा मार्ग मोकळा करता येतो असेही सांगीतले.वाशिम पोलिस दलातील प्रदिप आजही ऊत्तम प्रकारे आपले कर्तव्य बजावुन त्यामधील सध्याकाळी ५ ते ७ या कालावधीमध्ये तरुणांसाठी मैदाणावर मोफत पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरु असुन पोलीस दलात लागण्यासाठीची मैदानी आणी परिक्षात्मक मुद्यांचे बाळकडू पाजण्याची सेवा देत असल्याने वाशिम पोलिस दलाला अभिमान आहे.वाशिम पोलीस दलात सेवाकार्य करत जनसेवेतुन जिव्हाळा पेरत प्रेमाशी माणसे जोडणे हा प्रदीपचा छंद.गोरगरीब,कष्टकरी,शेतकर्‍यांच्या मुलांसाठी स्वतःला झिजवुन तरुणाईला घडवण्याचे आजही अविरत कार्य सुरु आहे.आकाशाला गवसणी घालण्याची ऊमेद निर्माण करण्याची ऊर्जा या खाकीतील प्रदिपला असुन अशा तरुणाईला विधायक मार्गाकडे वळवून त्यांचे जीवन घडवणार्‍या या ध्येयवेड्या खाकीतील प्रदिपचा सन्मान होणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरत आहे.जिल्ह्याचे पालकमंञी,पोलीस अधिक्षक यांनी प्रदिप बोडखेच्या सेवाकार्याची दखल घेवून पुरस्कारासाठी प्रयत्न करावेत आणी त्यांच्या या सेवाभावनेची सेवापुस्तीकेतही नोंद घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206