रावेर (शेख शरीफ)
रावेर ग्रामीण रुग्णालयात एच एस पाटील यांनी सेवा बजावत असतांना गरीब वृद्ध व्यक्तीची मोतीबिंदूच्या माध्यमातुन केलेली शस्त्रक्रीया अतुलनीय आहे.आलेल्या रुग्णाची आपल्या आई-बाबा प्रमाणे नेत्रचिकीत्स अधिकारी डॉ पाटील यांनी सेवा केली आहे त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे अनेक गरीब कुटुंबाना त्यांची आठवण झाल्या शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश राणे यांनी व्यक्त केले
येथील रावेर ग्रामीण रुग्णाययातील नेत्रचिकित्सा अधिकारी .एच.एस.पाटील मंगळवार ३१ मे रोजी वैद्यकीय सेवे देत ३३ वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर नेत्रचिकित्सा अधिकारी या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहे. त्यानिमित्ताने यानिमित्ताने बुधवार दि१ जून रोजी स्नेह रावेर ग्रामीण रुग्णालयात मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित केला यावेळी श्री राणे बोलत होते. डॉ जयंत तोडकर डॉ प्रशांत पाटील डॉ आश्विन महाजन डॉ दिपक सोळंकी औषध निर्माता प्रशांत जंगले परीचारीका रीता धांडे किशोर झोपे के जे पाटील यांच्या सह रावेर ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.