Home यवतमाळ प्रयासवन येथे सिडबॉल प्रशिक्षण कार्यशाळा

प्रयासवन येथे सिडबॉल प्रशिक्षण कार्यशाळा

187

 

यवतमाळ – पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियमित वृक्ष लागवडीबरोबरच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होण्याकरिता प्रयास यवतमाळ तर्फे रविवार दि. 5 जूनला पर्यावरण दिनानिमित्त सकाळी 7.30 ला सिडबॉल प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. गोधनी रोडवरील प्रयासवन येथे होणार असलेल्या या दोन तासांच्या कार्यशाळेचे उदघाटन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मा. माधुरी मडावी यांच्याहस्ते होणार आहे. या विषयाच्या अभ्यासक अमृता खंडेराव या प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. तर अध्यक्षस्थानी जेष्ठ प्रयासी सुधाताई पटेल असणार आहेत. कार्यशाळेत माती, पळसाची पाने, न्यूज पेपर, सुती कापड आदी पर्यावरणपूरक सहज उपलब्ध वस्तूंपासून सिडबॉल तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात सिडबॉल बनविण्यात येणार आहे. शाळा, कॉलेज, संस्था, संघटना, समूहांच्या अथवा पर्यावरणप्रेमी कुटुंबातील सर्व वयोगटातील सदस्यांनी या इको फ्रेंडली कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रयास यवतमाळ संस्थेच्या उपक्रम आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.