Home मराठवाडा आंबुलगा येथिल शांती निकेतन विद्यालय च्या तीन विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड च्या राज्यपुरस्काराने...

आंबुलगा येथिल शांती निकेतन विद्यालय च्या तीन विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड च्या राज्यपुरस्काराने सन्मान

144

मुखेड – प्रतिनिधी

नांदेड / मुखेड , दि. २९ :- तालुक्यातील मोजे आंबुलगा येथिल शांती निकेतन विद्यालयातील भगतसिंग स्काऊट गाईड च्या पथकातील विद्यार्थी मनोज खुशालराव येरेवाड यांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पालकमंत्री आशोकराव चव्हाण यांच्या हस्ते स्काऊट गाईड च्या राज्यपुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शाळेतील स्काऊट चे शिक्षक सुधाकर नारावाडसर उपस्थित होते.

तर सौरभ मेतलवाड व अनिल व्यंकटराव पांचाळ यांना शांती निकेतन विद्यालयातील मुख्याध्यापक मा. सुधाकर मामीलवाडसर केंद्रांचे केंद्र प्रमुख दासरवाडसर यांच्या हस्ते स्काऊट गाईड च्या राज्यपुरस्कार प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक साईबाबा नल्लामडगे ,पत्रकार पवन जगडमवार,तसेच शांती निकेतन विद्यालयातील भगतसिंग स्काऊट गाईड चे शिक्षक आंतेश्वर चंदावाडसर, सुभाष अंबुलगेकर सर, लगडेसर, एम एस कांबळे सर, जयश्री मँडम गोविंदवार, संगिता रामोड मँडम, ए एम कांबळेसर, आंधळेसर,बालाजी डोंगळीकर सर, रमन काब्देसर, गिरीदास पन्नमवाड, सेवक प्रभाकर धनवडे, नर्सिंग गंटलवार,गोविंद बरबडेकर, यांच्या सह असंख्य विद्यार्थी विद्यार्थीणी यावेळी उपस्थित होते.