यवतमाळ – येथील नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष स्व. योगेश गढीया यांच्या स्मृती निमित्त गढीया परिवाराद्वारे संचालित गुरु गणेश विवेक गौशाला चे उद्घाटन मंगळवार दि. 7 जून रोजी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त 7 जून रोजी सकाळी 6 वाजता गौसेवा पदयात्रा गुरु गणेश पौषध शाळा परमपुज्य बाबुलालजी म. सा. यांचे स्मारक येथून प्रारंभ होणार असून छत्तीसगढ शिरोमणी गुरुवर्य प. पु. रतनमुनीजी म. सा. व श्रद्धेय गुरुवर्य स्व. विवेकमुनीजी म. सा., यांच्या प्रेरणेतून उपप्रवर्तक प. पु. गौरवमुनीजी म. सा. यांच्या मार्गदर्शनात या गौसेवा पदयात्रेत मधुर गायक परमपुज्य शुक्लमुनीजी म. सा., मौन साधक परमपुज्य सौरभ मुनीजी म. सा., उपप्रवर्तक परमपुज्य गौरवमुनीजी म. सा., नवदिक्षीत प. पु. सार्थकमुनीजी म. सा., नवदिक्षीत प. पु. अर्पणमुनीजी म. सा. हे प्रामुख्याने या गौसेवा पदयात्रेत सहभागी होत असून ही गौसेवा पदयात्रा गुरु गणेश विवेक गौशाला भारी येथे विसर्जित होईल.
गौसेवा पदयात्रेत सहभागी बांधवांची अल्पोपहाराची व्यवस्था श्रीमती आशादेवी महादेव मोर यांच्या वतीने तर गौतम प्रसादी, स्व. योगेश गढीया परिवाराच्या वतीने गढीया उद्यान भारी नागपूर रोड गिलाणी पेट्रोल पंप जवळ यवतमाळ येथे करण्यात आली आहे. या आयोजनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जैन सेवा समिती यवतमाळ, जैन श्रावक संघ कळंब, जैनम युवा मंच कळंब, श्री महावीर सेवा समर्पण समिती, जैन युवा समिती, जैन महिला समिती, गौसेवा समिती यवतमाळ यांनी केले आहे.