वाशिम:-जगप्रसिध्द असलेल्या आंतराष्टीय क्षेञ म्हणून ओळखल्या जाणार्या मंगरुळपीर तालुक्यातील तर्हाळा येथे असणार्या दर्ग्याला वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक श्री.बच्चनसिंह यांनी दि.८ जुन रोजी भेट देवुन तेथील परिसराची पाहणी करुन तसेच व्यवस्थाकासोबत चर्चा करुन सुरक्षाविषयक आढावा घेतला.
वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक श्री.बच्चनसिंह यांनी पदभार स्विकारल्यापासुन जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था नांदावी म्हणून प्रकर्षाने प्रयत्न केलेत.विविध ऊपक्रमाव्दारे चांगल्या बाबीला प्रोत्साहन दिले तसेच जिल्ह्यातुन गुन्हेगारी हद्दपार व्हावी याकरीता ठोस पावले ऊचलत अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणांना भेटी देवुन तेथील सुरक्षाविषयक माहीती घेवुन आवश्यक त्या ऊपाययोजनेवरही भर दिला.दि. रोजी०८ मे २०२२ रोजी पोलीस स्टेशन मंगरुळपीर अंतर्गत नागपूर औरंगाबाद महामार्गावर असलेल्या ग्राम तर्हाळा येथील बाबाजान दर्गा येथे श्री.बच्चन सिंह पोलीस अधीक्षक वाशीम
यांनी सायंकाळी पाच वाजता दर्गाला भेट देवून परिसराची पहाणी केली तसेच दर्गाहचे व्यवस्थापक यांचे सोबत चर्चा करुन सुरक्षेचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक यांनी
पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथील ठाणेदार सुनिल हुड यांना सुरक्षेसबंधाने आवश्यक उपाय योजना
करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी ऊपविभागिय पोलिस अधिकारी श्री. यशवंत केडगे ,मंगरुळपीरचे ठाणेदार श्री.सुनिल हुड आणी बाबाजान दर्गाचे व्यवस्थापक हजर होते.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206