पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीणचा पुढाकार
वाशिम:-नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी त्या संबंधित आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन ग्रामस्थ तसेच युवा वर्गांनी प्रशासनासोबत सहभागी होऊन मदतीसाठी सामोरे जाण्यासाठी सरसावले पाहीजे हे आजच्या काळासाठी अतिशय महत्वाचे आहे असे ऊद्गार दिपक सदाफळे पिंजर (जिवरक्षक) यांनी काढले आहे.पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीणसह हद्दीतील सर्व पो.क. आणी होमगार्ड तसेच पो.पा.व ईतर विभागाचे शासकीय प्रतिनिधी कर्मचारी यांना एकबुर्जी प्रकल्पावर मान्सूनपूर्व उपाययोजना आणी सज्जता याविषयावर रंगीत तालीमसह मार्गदर्शन कार्यक्रमातुन आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले आहेत.
दि.7 जुन 2022 रोजी पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीणच्या पि.एस.ओ. महक स्वामी प्रोबेशनल (IPS) यांच्या आदेशाने मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने वाशीम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पावर मान्सून परीस्थितीत उद्भवणा-या आपात्कालीन घटनांमध्ये पूर परिस्थितीत करावयाच्या कार्यवाही आणी त्यावर उपाययोजना बाबतचे मार्गदर्शन व रंगीत तालीम देण्यात आली.या प्रशिक्षणाचे प्रशिक्षक व मार्गदर्शक पिंजर जिल्हा अकोला येथील मानव सेवा विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे (जिवरक्षक) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून रबर बोटीच्या सहाय्याने पूरपरिस्थितीत अडकलेल्या व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्याची पद्धतीचे व त्यावर प्रात्यक्षिके सादर केली.यावेळी आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक व प्रशिक्षक दीपक सदाफळे (जिवरक्षक ) यांनी आपल्या मार्गदर्शनातुन समाजाची भुमीका आणी जबाबदारी सोबतच युवकांचे योगदान आणी कर्तव्य राबविण्याची माणसिकता सर्वांमते असायला हवी.प्रत्येक परीवाराने मान्सूनपूर्व आढावा घेऊन आपल्या परीसरातील पावसाळ्यात उद्भवणारे संभाव्य धोके (हजार्ड) लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्यासाठी सज्ज झाले पाहीजे. उपस्थितीतांना लक्षात आणुन देत या विषयाला आपण सर्वांनी नोटीस केले पाहीजे,आजच्या कार्यक्रमाचे प्रशिक्षक दिपक सदाफळे (जिवरक्षक ) यांनी उपस्थितांना आपले कर्तव्य आणी जबाबदारी याच सोबत पूर,विज,भुस्खलन, अशा उद्भवणा-या नैसर्गिक आपात्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी कशा प्रकारच्या उपाययोजना कराव्यात या बाबत योग्य माहिती दिली.पूर परिस्थिती निर्माण झाल्यास अशावेळी वेळेचा विलंब न करता तात्काळ जिवीत व वित्तहानी वाचविणे गरजेचे असते.आपत्तीच्या काळात जेव्हा बचाव कार्याची परीस्थिती निर्माण होते,अशावेळी मदत करण्यासाठी समोर येणे ग्रामस्थांचे विशेषतः युपिढीचे कर्तव्य असते. त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थांनी आपत्तीच्या काळात आपले योगदान दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले यासोबतच पावसाळयात ग्रामस्थांनी आपल्या गाव परीसरातील पुर प्रवण क्षेत्रातील संभाव्य धोके ओळखुन अशा प्रकारच्या आपत्ती घडुचनये यावर भरदीला पाहीजे या आधी घडलेल्या घटनांचा संक्षिप्त आढावा घेऊन पुर्व तयारीनिशी यावर काही उपाययोजना करण्यासाठी प्लॅनिंग केली पाहिजे.जर काही अशा घटना घडल्यातर यावर आपआपली जबाबदारी आणी कर्तव्याची जाण ठेऊन पोलीसांना सुव्यवस्थीतपणे माहीती देऊन ग्रामस्थांनी विषेशतः युवकांनी प्रशासनासोबत सहभागी होऊन संकटात सापडलेल्या संकट ग्रस्थांच्या मदतीसाठी व सहकार्यासाठी कसोशीने प्रयत्नशील व सज्ज राहिले पाहिजे.असे आजचे प्रशिक्षक दीपक सदाफळे यांनी आपल्या मार्गदर्शनातुन सांगितले आहे.आजच्या कार्यक्रमाला पो.स्टे. वाशिम ग्रामीणच्या पि.एस.ओ.महक स्वामी प्रोबेशनल (IPS) यांनी मार्गदर्शन केले तर प्रास्ताविक पि.एस.आय. रमेश पाटील साहेब यांनी केले,या कार्यक्रमाला पो.स्टे.ग्रा.वाशिम जिल्हा हद्दीतील सर्व पोलीस ठाणे व वीज वितरण कार्यालय,पोलीस विभाग,होमगार्ड विभाग, पोलीस पाटील,उपस्थित होते.पो.ग्रा.वा.च्या पी.एस.ओ.प्रोबेशनल (IPS) महक स्वामी यांच्या आदेशाने कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पि.एस. आय.रमेश पाटील सर, यांच्या मार्गदर्शनात ए.एस.आय.सोळंके साहेब पो.काॅ.कैलास बळी,योगेश इंगळे,विजय ढोरे,नागेश देवळे,कीशोर काकड,यांनी परीश्रम घेतले आणी प्रशिक्षणासाठी सहकार्य टीम म्हणून मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे स्वयंसेवक ऋषीकेश राखोंडे,सतीश चव्हाण, आशिष गुगळे,राम काकड, गोविंदा ढोके,यांनी परिश्रम घेतले.अशी माहिती वाशिम जिल्हा ग्रामीण पो.स्टेशन चे पो.काॅ. केलास बळी यांनी दिली आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206