Home बुलडाणा साखरखेर्डा येथील भोगावती नदीच्या तीरावरील पर्यायी पूल गेला वाहून ,

साखरखेर्डा येथील भोगावती नदीच्या तीरावरील पर्यायी पूल गेला वाहून ,

526

 

ठेकेदाराचा हलगर्जीपणा भोवला ,

सिंदखेडराजा ,

साखरखेर्डा — लव्हाळा मार्गावर भोगावती नदीच्या नवीन पुलाचे काम सुरू होते दरम्यान तात्पुरता वाहतूकीसाठी येथे उभारण्यात आलेला पूल वाहून गेला असून लव्हाळा साखरखेर्डा, मेरा चौकी साखरखेर्डा मार्ग बंद झाला असल्याने या मार्गावरून कुणीही येऊ नये . माती भराव वाहून गेला आहे . यासाठी चिखली , बुलडाणा , खामगाव आणि जवळपासच्या १५ गावातील नागरिकांनी लव्हाळा देऊळगाव माळी मार्गे साखरखेर्डा यावे . दरेगाव , मेरा बु या भागातही पाऊस झाल्याने तो मार्गही बंद आहे . भोगावती नदीवरील पुलाचे काम करणारा ठेकेदार फरार झाला आहे . युवा सेना तालुका प्रमुख संदीप मगर सह अनेकांनी आणि महात्मा फुले मंडळाच्या युवकांनी काही शेतकरी आणि शेतमजूर यांना प्रवाहातून अलीकडे आनले आहे . यात दोन शेतकरी वाहून गेले असून महात्मा ज्योतिबा फुले युवक मंडळाचे कार्यकर्ते त्यांचा शोध घेत आहेत . महसूल विभागाचे अधिकारी किंवा इतर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांने येथे आता पर्यंत हजेरी लावली नाही .