Home मराठवाडा सुंदरलाल बगीनवाल यांची इमारत बांधकाम कामगार मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करावी–कुमावत...

सुंदरलाल बगीनवाल यांची इमारत बांधकाम कामगार मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करावी–कुमावत समाज विकास सेवा संस्था

422

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

इमारत बांधकाम कामगार मंडळ समितीवर कामगार प्रतिनिधी म्हणून सुंदरलाल बगीनवाल यांची नियुक्ती करण्यात यावी.कारण जालना जिल्ह्यातील कामगारांसाठी ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.तसेच ते कुमावत बेलदार समाजाचे असून त्यांचा पिढीजात मूळ व्यवसाय हा बांधकाम करणे आहे.त्यामुळे त्यांची नियुक्ती ही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामगार मंडळावर होणे गरजेचे आहे,असे निवेदन कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र यांच्यावतीने जालना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,इमारत बांधकाम कामगार मंडळाचे प्रामुख्याने शासकीय प्रतिनिधी,मालक प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधी या समितीद्वारे मंडळाचे कामकाज चालते.जालना जिल्ह्यातील कामगारांची बाजू खंबीरपणे मांडणारे नेतृत्व सुंदरलाल शिवलाल बगीनवाल यांची इमारत कामगार मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात यावी,अशा स्वरूपाची मागणी राज्यभरातून कामगार बांधव यांच्याकडून केली जात आहे.

सुंदरलाल बगीनवाल हे कुमावत बेलदार समाजाचे असून त्यांचा पिढीजात मूळ व्यवसाय बांधकाम करणे हा आहे.तसेच ते स्वतः कामगार असून बारा बलुतेदार संघाच्या माध्यमातून त्यांनी कामगार कार्यालय,कामगार आयुक्त कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय व लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क व पाठपुरावा करून कामगारांचे मोठ्या प्रमाणावर प्रश्न सोडवले आहेत.परंतु आजपर्यंत त्यांच्या कार्याची दखल शासनाने घेतली नाही.तेव्हा सुंदरलाल बगीनवाल यांची इमारत कामगार मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात यावी,असे निवेदन जालना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.

या निवेदनावर कुमावत समाज विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष साहेबराव कुमावत,सचिन देविदास परदेशी,जालना जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कुमावत,ऍड.गणेश जाजुरे,वैजिनाथ कुमावत,भीमाशंकर बबीरवाल,सांडू उदेवाल,सत्यनारायण जाजुरे,गंगाराम उदेवाल,शांतीलाल बबीरवाल,दिगम्बर मोरवाल,प्रफुल्ल कुमावत,अर्जुन अनावडे,अमोल कुमावत,रामधन कुमावत,सुभाष कुमावत,लक्ष्मण कुमावत यांच्यासह अन्य कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.