Home वाशिम २० दिवसाची मोहिमे दरम्यान जिल्हयात दारुबंदी अधिनियमान्वये कार्यवाही करुन २१० अटक करुन...

२० दिवसाची मोहिमे दरम्यान जिल्हयात दारुबंदी अधिनियमान्वये कार्यवाही करुन २१० अटक करुन एकुण ५.८ लाखाची अवैध दारू जप्त

219

 

फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम जिल्हयात अवैधरित्या दारू विकी वर पायबंद घालण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांनी जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच ठाणेदार यांना सुचना देवुन जास्तीत जास्त कारवाया करण्याचे आदेश दिले आहे.
त्याअनुशंगाने जिल्हयातील पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे १२ केसेस, वाशिम ग्रामीण १६ केसेस, रिसोड १८ केसेस, शिरपुर केसेस १५, मालेगाव ९ केसेस, मंगरुळपीर २४ केसेस, अनसिंग ११ केसेस, आसेगाव १३ केसेस, जऊळका १४ केसेस, कारंजा शहर १३ केसेस, कारंजा ग्रामीण ३३ केसेस, मानोरा १६ केसेस, धनज १३ केसेस करून असा एकुण १३ पोलीस स्टेशन अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये २०७ गुन्हे दाखल केले असुन एकुण २१० आरोपीवर गुन्हे नोंदविण्यात आले. आरोपीकडुन एकुण ५८३२६५ /- रू. किंमतीची देशी विदेशी तसेच गावठी हातभटटीची दारू जप्त करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात, अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम, मंगरूळपीर आणि कारजा, पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम,तसेच जिल्हयातील सर्व ठाणेदार यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.मा. पोलीस अधीक्षक वाशिम श्री बच्चन सिंह यांनी सर्वजनतेस सुजाण नागरिक म्हणुन अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती दयावी माहिती देणाऱ्या इसमाचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असे आवाहन केले आहे.