डॉ. निरज वाघमारे मित्र परिवारा तर्फे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन.
यवतमाळ ( प्रतिनिधी ) – यवतमाळ जिल्हा हा आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात लक्षावधी तरुण – तरुणी सुशिक्षत बेरोजगार आहे. जिल्ह्यात उद्योगाची व त्यावर आधारित व्यवसायाची प्रचंड उणीव आहे. केवळ ऊपलब्ध शासकीय, प्रशासकीय व खाजगी नोकऱ्या तेवढ्याच आहेत. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर कोणत्या क्षेत्रात आपल करीयर करावे किंवा त्या त्या क्षेत्रासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने डॉ. निरज वाघमारे मित्र परिवारा तर्फे उदयाला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
आपल्या शिकविण्याच्या अनोख्या शैलीने अल्पावधीतच सुपरहिट झालेले ‘ खद खद ‘ फेम शिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रा . नितेश कराळे या मेळाव्यात स्पर्धा परीक्षार्थीना मार्गदर्शन करणार आहेत. शहरातील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय परिसरातील श्रोतृगृहात दिनांक 19/6/2022 सकाळी ११.०० या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे शहरातील व जिल्हयातील स्पर्धा परिक्षार्थ्यानी या मार्गदर्शन मेळाव्यात उपस्थीत राहावे असे आवाहन आयोजक डॉ. निरज वाघमारे मित्र परिवारा तर्फे करण्यात येत आहे…