Home मराठवाडा कृषी सेवा केंद्रात चोरट्यांनी मारला डल्ला

कृषी सेवा केंद्रात चोरट्यांनी मारला डल्ला

293

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

बळीराजा कृषी सेवा केंद्राच्या दुकानाची मागच्या बाजूची भिंत फोडून अज्ञात चोरट्याने एक नव्हे तर ५०० कपाशीच्या बॅगा व गल्ल्यातील रोख ३० हजार असा ५ लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शहागड -पैठण रोडवरील साष्टपिंपळगाव येथे दि.१६ जूनच्या मध्यरात्री घडली असून चोरी झाल्याची घटना दि.१७ जून रोजी सकाळी ८ वाजता दुकानदार गणेश शिंदे दुकान उघडण्यासाठी गेल्या नंतर हि चोरीची घटना समोर आली.

सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाल्याने दुकानदारांनी कपाशी,तुर,बाजरी,बियाणांचा माल खरेदी करण्यात येवून कपाशीचे क्षेञ वाढणार असल्याने कपाशीच्या मोठी मागणी असल्याने विक्रीसाठी आणलेले बियाणे चोरट्यांनी ऐण हंगामाच्या वेळी लंपास झाल्याने कृषी सेवा केंद्र चालकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील शहागड -पैठण रोडवरील गणेश शिवाजी शिंदे हे दि.१७ जून रोजी सकाळी ८ वाजता बळीराजा कृषी सेवा केंद्र दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून अज्ञात चोरट्याने कपाशीचे ५०० बॅग,इतर बियाणे २ व  गल्ल्यातील ३० हजार रुपये चोरून नेले.

कपाशी बॅगा चोरी गेल्याने दुकानदाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे.चोरीच्या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ,पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळासे,डीबी पथक ठसे घेण्यासाठी तज्ञांना व श्वान पथकाला पाचारण केले गेले.श्वान घटनास्थळावरून काही अंतरावर घुटमळले.  

चोरीच्या घटनेचा तपास सुरू असून याप्रकरणी अद्याप कुठलीही तक्रार दाखल नसल्याचे पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळासे यांनी सांगितले.