Home मराठवाडा अंबड- घनसावंगी तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

अंबड- घनसावंगी तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

517

 

जालना-लक्ष्मण बिलोरे

अंबड – घनसावंगी तालुक्यातील परिसरात गत आठवड्यात जेमतेम झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केली होती.आता पावसाने ब्रेक दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढुन येत आहे.आजपर्यंत सरासरी तालुक्यात सरासरी ३७.५८ मिलिमीटरची नोंद झाली आहे.

गत आठवड्यात दोन दिवस जेमतेम पाऊस पडला होता.जेमतेम झालेल्या पावसाने काळया रानातील नांगरीटीचा ढेकुळ सुध्दा फुटला नाही.कुंभार पिंपळगाव,तीर्थपुरी,जांबसमर्थ, शिवारात तसेत शहागड,महाकाळा,वडीगोद्री  परीसरातील दह्याळा,भांबेरी शिवारात मध्यम पाऊस पडला.तर अंतरवाली सराटी,नालेवाडी,सौदलगाव,दोदडगाव रामगव्हाण,टाका,दुनगाव परिसरात जेमतेम पेंड ओलता पाऊस पडला.

सलग काही दिवस पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन पाऊस येईल म्हणून भोळ्या आशेवर शेतकऱ्यांनी घाई केली.परिसरात मोठ्या प्रमाणात घाई करत महागड्या अनेक कंपनीचे बियाणे खरेदी करून कपाशी लागवड केली.परंतु तेंव्हापासून कपाशीची लागवड झाली.

पावसाने उघडीप दिल्याने पिकांनी भुई सोडली नसल्याने पावसाअभावी वाढ खुंटुन पान-दोन पानांवर कपाशी पिकाचे मोड दिसुन येत आहे.काही ठिकाणी हे पिक जाग्यावरच कोमेजुन जाऊन पिकांची उगवण ही मोठ्याप्रमाणात घटली आहे.पाऊस नसल्याने जे कोवळे रोप आहे.त्याला पैशा नावाचा किडा खाऊन टाकत आहे.काही ठिकाणी जमीनही भेगाळेलेली पाहयाला मिळतं आहे.

आताही जरी पावसाने हजेरी लावली तरी तुट मोठ्या संख्येने पडणार आहे.ही तुट भरून लागवडीचे आवाहन राहुन लागवड केलेल्या पिकात मेहनत पण पावसामुळे ठप्प झाल्याने जेमतेम उगलेल्या पिकाला किडी खाऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.सध्या दिवसभर ऊन राञीचे आभाळी वातावरण असते.असेच वातावरण राहीले आणि दोन ते तिन दिवसात जर पावसाने हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांनी लागवड करण्यात आलेली पिके जळून जाऊन शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढले जाणार आहे.

अंबड मंडळात २५ मी.मी.,धनगरप्रिंपी २६,जामखेड ५१,वडीगोद्री ४९,गोंदी ३१,रोहिलागड ५८,सुखापुरी मंडाळात २३ मि.मि.पावसाची नोंद झाली आहे.गतवर्षी ही पावसाची नोंद दुप्पट ते तिप्पट होती.जुनं महिना अर्धा संपला तरी पाऊस समाधानकारक पडला नाही.शेतकऱ्यांचे पिके पावसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने आता पुन्हा खर्चाचा भार व दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढले आहे.