Home यवतमाळ देश घडवायचा असेल तर युवकांनी राजकारणाचा मार्ग निवडावा…!

देश घडवायचा असेल तर युवकांनी राजकारणाचा मार्ग निवडावा…!

150

 

स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन मेळाव्यात प्रा. नितेश कराळे यांचे वक्तव्य

यवतमाळ ( प्रतिनिधी ) – देशात सद्या अराजकता माजली असून देश लोकशाही कडून हुकूमशाही कडे मार्गक्रमण करत असल्याने युवकांनी राजकारणा पासून दूर न जाता राजकीय क्षेत्रात करियर करावे तरच हा देश आणि देशांतील लोकशाही टिकेल अस वक्तव्य प्रा. नितेश कराळे यांनी केले. डॉ. निरज वाघमारे मित्र परिवारा द्वारा स्थानिक श्रोतृगृहात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.
आपल्या वकृत्व शैलीवर वऱ्हाडीचा साज चढवून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शना सह सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्पेशल विनोदी शैलीने प्रसिद्ध असलेले फिनिक्स करियर डेवलपमेंट अकॅडमीचे संचालक प्रा. नितेश कराळे यांचे स्थानिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभावे याकरिता सामजिक कार्यकर्ते डॉ. निरज वाघमारे व मिञ परिवाराच्या वतीने काल दिनांक १९ जुन २०२२ रोजी वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाच्या श्रोतृगृहात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील हजारो विद्यार्थांनी उपस्थिती दर्शविली होती. देशातील वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, शिक्षण या प्राथमिक समस्या कडे दुर्लक्ष करून सत्ताधारी “अग्निपथ” सारख्या फसव्या योजना आणून जनतेचे लक्ष भरकटवण्याचे षडयंत्र करीत असल्याचा आरोप प्रा. नितेश कराळे यांनी केला.
देश आणि देशांतील लोकशाही आबाधित राखायची असेल तर सुशिक्षित युवकांनी देशाच्या राजकारणाकडे दुर्लक्ष न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला शासन कर्ता समाज घडविण्याकडे वाटचाल करावी अस मत यावेळी त्यांनी मांडले.
मध्यंतरीच्या काळात स्पर्धा परीक्षेत आपल करीयर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली माञ या अनुषंगाने शासनाकडून अपेक्षित नोकर भरती करण्यात आलेली नाही. त्यामूळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ व यातून युवकांत नैराश्य आणि आत्महत्ये सारखे टोकाचे पावले युवक उचलत आहेत. मी स्वतः बी. एस. सी. मद्ये ४ वेळा अपयश आले तरी मी खचून गेलो नाही. यासर्वांवर मात करून मी पुढे चालत राहिलो शिक्षणा बरोबर शेती करत स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारून या क्षेत्रात आलो. त्यामुळे विद्यार्थांनी कुठेही खचून न जाता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून चांगल्या पदावर जाव व समाजसेवा करावीअसे आवाहन प्रा. कराळे यांनी विद्यार्थ्यांना केलें. या दरम्यान त्यांनी शासनाच्या अनेक धोरणांवर सडकून टीका केली. या मेळाव्यास शहरातील हजारो विद्यार्थांनी हजेरी लावल्याने संपूर्ण सभागृह गर्दीने भरून गेल्याने विद्यार्थांनी मंचावर व सभागृहा बाहेर तोबा गर्दी केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन साहील दरणे तर आभार आयोजक डॉ. निरज वाघमारे यांनी मानले..
###चौकट###
मेळाव्यात आय. ए. एस. स्वप्निल सिसले यांचा सत्कार..

नुकत्याच लागलेल्या भारतीय लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत स्थानिक वैशाली नगरातील स्वप्नील सिसले या विद्यार्थ्याने नेत्रदीपक यश प्राप्त केल्याने डॉ. निरज वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व सन्मान पत्र देउन त्यांचा गौरव करण्यात आला…