Home वाशिम रिसोडात पुन्हा शस्त्र अधिनियमांन्वये कारवाई : वाशिम जिल्ह्यात आठवडाभरात ०५ तलवारी जप्त

रिसोडात पुन्हा शस्त्र अधिनियमांन्वये कारवाई : वाशिम जिल्ह्यात आठवडाभरात ०५ तलवारी जप्त

158

 

वाशिम:-समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे.

काही असामाजिक घटक समाजाची शांतता भंग करण्यासाठी व जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्रांचा वापर करतात. त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात येते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली आज रिसोड तालुक्यातील ग्राम व्याड येथे विनापरवाना घातक धारदार शस्त्र बाळगत समाजामध्ये धाक, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ सहकलम १३५ म.पो.का.अन्वये कारवाई करण्यात आली.पो.स्टे.रिसोड हद्दीतील ग्राम व्याड येथे एका २३ वर्षीय युवकाजवळ विनापरवाना धारदार तलवार आहे अशा गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष सदर आरोपीच्या घराची झडती घेतली असता आरोपीच्या घरातील लोखंडी बाजेच्या गादीखाली फिक्कट गुलाबी रंगाच्या ओढणीमध्ये एक लोखंडी धातूची पितळी मुठ असलेली तलवार मिळून आली. सदर युवकाजवळ शस्त्र बाळगण्याचा कुठलाही परवाना नसतांना घातक धारदार शस्त्र मिळून आल्याने सदर युवकावर पो.स्टे. रिसोड येथे अप.क्र. ३३८ / २२ नुसार कलम ४, २५ शस्त्र अधिनियम सहकलम १३५ म.पो.का. अन्वये कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरातील शस्त्र अधिनियमांन्वये करण्यात आलेली हि चौथी कारवाई असून त्यामध्ये एकूण ०५ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. वर्षभरात पो.स्टे. रिसोड येथे ०३, पो.स्टे. अनसिंग येथे ०१, पो.स्टे. मानोरा येथे ०२, पो.स्टे. वाशिम शहर येथे ०३, पो.स्टे. कारंजा शहर येथे ०२ कारवाया अशा एकूण ११ कारवाया शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाया करण्यात आल्या आहेत.सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सोमनाथ स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या पथकातील पोहवा. सुनिल पवार, पोना. प्रशांत राजगुरू, पोना.राजेश राठोड, पोकॉ. निलेश इंगळे, पोकॉ. संतोष शेनकुडे, पोकॉ. डिगांबर मोरे व पोकॉ. अविनाश वाढे यांनी पार पाडली. नागरिकांनी अश्याप्रकारे विनापरवाना शस्त्र बाळगीत समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू पाहणाऱ्या इसमांविरुद्ध न घाबरता समोर येऊन तक्रार देण्याचे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी केले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206