यवतमाळ ( प्रतिनिधी ) – भारतीय संविधानाच्या ७७ व्या व ८५ व्या घटनादुरूस्तीप्रमाणे अनुच्छेद १६ ( ४ अ ) च्या घटना दुरूस्ती नुसार पदोन्नतीतील आरक्षण सर्व मागासवर्गीस अधिकारी कर्मचारी यांना लागू करण्यात आली होती. या नुसार महाराष्ट्रात मागासवर्गीसांकरीता आरक्षण कायदा २००१ निर्माण करण्यात आला. त्याची अंमलबजावणी २५ मे २००४ च्या शासन निर्णयानुसार सर्व टप्यावर पदोन्नती लागु करण्यात आली . परंतु शासनाने महाराष्ट्रातील विजय घोगरे हा चेहरा समोर करून या बाबत उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यात आली. व मुंबई उच्च न्यायालयाने दि . ४ ऑगस्ट २०१७ ला सदरहू शासन निर्णय रद्द करण्याचा निवाडा दिला. याबाबत आजपर्यंत अनेक याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आहे . सर्वोच्च न्यायालयाने १४ सप्टेंबर २०२१ रोजी पदोन्नतीतील आरक्षण लागु करण्याची जबाबदारी राज्यशासनाची राहील असा निवाडा दिलेला आहे . केंद्रशासनाचे मागासवर्गीय पदोन्नतीबाबत १२ एप्रिल २०२२ रोजी परिपत्रक निर्गमीत करण्यात आले असताना सुद्धा याबाबत राज्य शासनाने कुठलीही कार्यवाही केलेली नाही. व राज्यशासन याबाबीकडे डोळे झाक पणे काम करित आहे . त्यामुळे मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी पदोन्नतीपासुन पासून वंचित राहत आहे. मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यास असंतोष निर्माण झालेला आहे . या सर्व बाबींवर प्रबोधनात्मक कृतिशील लढा उभारण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . या मधील विषय हा पदोन्नतीतील आरक्षण असून कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ राठोड माजी खासदार, आमदार आरक्षणाचे गाढे अभ्यासक प्रमुख मार्गदर्शक एन . बी . जारोंडे उपाध्यक्ष राष्ट्रीय मजदूर युनियन , नागपूर यांची उपस्थिती राहणार आहे.सदर कार्यशाळा २२ जून २०२२ ला सायंकाळी ६ वाजता स्थळ : भावे मंगल कार्यालय , समता ग्राउंड जवळ , यवतमाळ येथे संपन्न होणार आहे. असे ओमप्रकाश नगराळे , मनोहर शहारे , आनंद भगत , धम्मा कांबळे , सोपानराव कांबळे तसेच ऑफिसर फोरम बानाई, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कार्यवाहक प्रजासत्ताक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ, नागभूमि रामदास राऊत , अध्यक्ष समतापर्व प्रतिष्ठान, अध्यक्ष भारतीय बंजारा कर्म सेवा संस्था राष्ट्रीय उपाध्यक्ष विमुक्त घुमन्तू जनजाती महासंघ डॉ . सुगतचंद राठोड राष्ट्रीय सचिव विमुक्त घुमन्तू जनजाती महासंघ समस्त या लढ्यातील लाभांकित SC , ST , VJNT कर्मचारी व अधिकारी आणि सामाजिक सर्व संघटना सामिल होणार आहेत. या हक्काच्या लढ्यासाठी सर्व कर्मचारी बांधवांनी कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी इंजिनियर मनोहर शहरे नामदेव थुल यांनी केले आहे.