Home यवतमाळ जागतिक प्लास्टीक बॅग निर्मुलन दिनानिमीत इको ब्रिक्स संकलन व जनजागृती कार्यशाळा प्रयास...

जागतिक प्लास्टीक बॅग निर्मुलन दिनानिमीत इको ब्रिक्स संकलन व जनजागृती कार्यशाळा प्रयास , प्लॉगर व नगर परिषदेचे आयोजन

188

 

यवतमाळ ( प्रतिनिधी ) पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात सेवारत असलेल्या प्रयास यवतमाळ आणि यवतमाळ प्लॉगर आणि नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि . ३ जुलैला सकाळी ७ वाजता नगर परिषद कार्यालय परिसरात इको ब्रिक्स संकलन व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . रविवारी सकाळी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी , संस्था व संघटनांचे सदस्य तसेच पर्यावरणप्रेमी यवतमाळकर हे नगर परिषद , आझाद मैदान , इंदिरा गांधी मार्केट , मध्यवर्ती बैंक , पोलीस स्टेशन , मेन लाईन आदी जवळील परिसरात स्वयंस्फुर्तपणे प्लास्टीक उचलून जमा करणार आहे . बालगोपालांना ईको ब्रिक्स कशा तयार करायच्या , त्याचा फायदा काय , प्लास्टीकचे नुकसान काय आदी सर्व माहिती प्रशिक्षण दिले जाणार आहे . मशहरात पहिल्यांदाच मोठ्या स्वरुपात इको ब्रिक्स विषयातील कार्यशाळा व उपक्रम होत असुन यवतमाळकरांनी स्वच्छ व आरोग्यदायी शहर ठेवण्यासाठी आवर्जुन या जनजागृती मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे . चौकट ईको ब्रिक्स स्पर्धा नगर परिषदेतर्फे यवतमाळकरांसाठी ईको ब्रिक्स निर्मीती स्पर्धा होणार आहे . सर्वाधिक ब्रिक्स बनविणार्यांना अनुक्रमे तीन , दोन , एक हजारांचे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते दिले जाणार आहे . वैयक्तीक अथवा गट कुठल्याही स्वरुपात स्पर्धकांना प्लास्टीकच्या बॉटल्समध्ये प्लास्टीकचा कचरा भरुन या ईको ब्रिक्स तयार करायच्या आहे . या ब्रिक्स २ जुलैला सायंकाळपर्यत नगर परिषद वाहनतळ येथे नोंदणी करुन जमा करायच्या आहे .

“चौकट” – जनजागृती प्रभातफेरी रविवारी सकाळी ७.३० ला जनजागृती समिती , माजी सैनिक संघटन , विवीध संस्था संघटना आणि पार्वती ऑटोमोबाईल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टीक निर्मुलनातुन स्वच्छ व आरोग्यदायी यवतमाळकरिता जनजागृती प्रभातफेरी काढण्यात येणार आहे . नगर परिषद , मध्यवर्ती बँक , पोलीस स्टेशन , आझाद मैदान , इंदिरा गांधी मार्केट , मेन लाईन या परिसरातून ही रॅली मार्गस्थ होणार आहे .