राजेंद्र भांड
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने वाटचाल करत असून त्र्यंबकेश्वर, नाशिक, सिन्नर, राहुरी, श्रीरामपूर, अहमदनगर, घोगरगाव, कोरेगाव, कर्जत दिनांक 3 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात पालखी सोहळा प्रवेश करणार आहे आत्तापर्यंतचा प्रवास 350 किलोमीटर झाला आहे ,v9 जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत पोहोचणार आहे. पोहोचणार आहे. या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले आहेत.
गेली दोन वर्षे कोरोना महामारी मुळे पायी वारी बंद होती यंदा मात्र या वारीत नवचैतन्य निर्माण झाले आहे. पायी वारकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे . कोरोनामुळे गेली दोन वर्षे रथ सजावटीची परंपरा बंद होती त्यामुळे सजावटकार मंडळी नाराज झाली होती .यंदा मात्र या मंडळीत चैतन्य संचारले आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या चांदीच्या रथाला दररोज नवनवीन प्रकारची फुले ,हार तुरे सजावटीच्या वस्तू वापरून आकर्षक सजावट केली जाते.
माडसांगवी येथील ह.भ.प. स्वर्गीय शिवाजी महाराज पेखळे यांच्या संकल्पनेतून ही रथ सजावट परंपरा उत्साहात चालू आहे.
यात्रा मार्गात मुक्कामाच्या ठिकाणी निरनिराळ्या मित्रमंडळी कडून दररोज रात्री रथाच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचून हि मंडळीअतिशय सुंदर सजावट करतात .या सजावटीसाठी साधारण 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. साधारण एक महिना रथ वारी पंढरपूर पर्यंत चालत जाते. दररोज निराळ्या पद्धतीने नैसर्गिक फुलांच्या माध्यमातून सुगंधी फुलांची रथाला सजावट डोळ्याचे पारणे फेडणारी असते.
स्वर्गीय शिवाजी महाराज पेखळे यांच्या निधनानंतर वारीची परंपरा त्यांचे चिरंजीव दशरथ पेखळे सांभाळत असून रथ सजावटीसाठी सुभाष काठे, राजू महाले ,डॉ.ज्ञानेश्वर पेखळे , अरुण बिडवे, रमेश वाघ, पांडुरंग बनकर ,वासू सोनवणे, सतीश मंडलिक, संजय विधाते, कैलास माळी, वरवंडी ग्रामस्थ मंडळ ,नाशिक फुल बाजार मित्र मंडळ ,वैभव पतसंस्था पळसे, संतोष ढमाले ,योगेश बोराडे , संत निवृत्तीनाथ महाराज पतसंस्था चिखली, कैलास घुमरे, हरिभाऊ गटकळ ,पांडुरंग गडकरी ,हरी भक्त परिवार जय बाबाजी परिवार, भास्करराव जगताप सामनगाव ,शिवशंभु प्रतिष्ठान आडगाव ,भाऊसाहेब टिळे ,चंद्रकांत टिळे, निवृत्ती जाधव ,वारकरी मंडळ शेवगेदारणा, राजेंद्र घुमरे ,संतोष घुमरे, ,कर्जत ग्रामस्थ, शंकर शेळके कोरेगाव, जय बाबाजी मित्र मंडळ मांडसांगवी, समस्त ग्रामस्थ उंबरखेड ,शिवनेरी मित्र मंडळ कंदर, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ भजनी मंडळ त्र्यंबकेश्वर पप्पू निकम, नामदेव लबडे, राजाराम थेटे ,संदीप लबडे गिरणारे, श्रीकृष्ण मित्र मंडळ बाभळेश्वर ,पिंपळणारे येथील ग्रामस्थांची वाखरी सोहळा सजावटआणि संजय तांबे आडगाव यांची पंढरपूर नगरप्रदक्षिणा सोहळा सजावट असते.आदींसह असंख्य सांप्रदायिक मंडळी सहभागी होउन रथ सजावटि च्या माध्यमातून सोहळ्याचा आनंद घेतात.
दोन दशकांपेक्षा अधिक जुनी रथ सजावटीची अखंडित परंपरा
श्री क्षेत्र त्रंबकेश्वर ते पंढरपूर वारी मार्गात मुक्कामाच्या ठिकाणी निरनिराळ्या मंडळींकडून दररोज रथांची फुलांनी सजावट
रथ सजावटीसाठी दररोज किमान 20 ते 25 हजार रुपये खर्च
माडसांगवी चे स्वर्गीय ह. भ .प .शिवाजी महाराज पेखळे यांच्या संकल्पनेतून नैसर्गिक फुलांची सजावट *दररोज नवीन थीम घेऊन रात्रीतून पहाटेपर्यंत चांदीच्या रथाला सुगंधी फुलांचे कोंदन निवृत्तीनाथ महाराज यात्रा सजावटीसाठी रथ सजावटकार मंडळींमध्ये संचारले चैतन्य धोरणामुळे दोन वर्ष खंडित परंपरा पुन्हा सुरु.
तसेच मांगल्याचे प्रतीक समजली जाणारी रांगोळी नाथांची पालखी मुक्कामाच्या ठिकाणाहून निघण्याच्या आधी पालखी तळापासून ते पालखीच्या मार्गावर धावपळ करत पोहोचण्याचे मोठे कसब अंगी असलेले राजेंद्र जुन्नरे (आळंदी) हे नाथांच्या* पालखी सोहळ्यात अनेक वर्षापासून सुंदर रांगोळी काढून पालखी सोहळ्यात चैतन्य निर्माण करतात रोज किमान २५ किलो रांगोळी लागते ते रांगोळीतून सामाजिक संदेश देखील देतात. यावेळी पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. पुंडलिकनाना थेटे यांनी पालखी सोहळ्यातील कार्यक्रमांची माहिती दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मित्रांसोबत संत निव्रुतीनाथ महाराज यांच्या रथ सजावट वारीत सहभागी होउन रथ सजावट करतो. त्यामुळे दरवर्षी आम्हाला नाथ वारीचा आनंद मिळतो. वारकरी संप्रदायाच्या या वारी ला दोन वर्षे कोरोना मुळे खंड पडला, मात्र आजही पुर्वी पेक्षाही जास्त प्रमाणात वारकरी या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. जो या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होईल त्यालाच या भक्ती मार्गाची अनुभूती येईल.
सुभाष काठे
आणि मित्र परिवार
रथ सजावट ग्रुप माडसांगवी नाशिक