Home जळगाव ३४ व्या दीवसाच्या उपोषणाला सांस्कृतिक निषेध कव्वाली ने नोंदविला , हमने अक्सर...

३४ व्या दीवसाच्या उपोषणाला सांस्कृतिक निषेध कव्वाली ने नोंदविला , हमने अक्सर नमाज पढ़ी है ,गंगा के पानी से वजू करके

334

शरीफ शेख

रावेर , दि. ३० :- जळगावचे लतीफ हैरा कुटुंबीयांतर्फे उपोषण स्थळी कव्वालीच्या माध्यमाने भारतीय नागरिकत्व कायद्याचा तसेच एन आर सी व एनपीआर चा विरोध नोंदविण्यात आला.
जळगाव मुस्लिम मंच द्वारे ३४ दिवसापासून सुरू असलेल्या लाक्षणिक उपोषणाला आज भारत बंद ची जोड असल्याने तरुणाईने बंदला कोणत्याही प्रकारचे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये म्हणून मुस्लिम मंचने त्या सर्व तरुणांना एकाच ठिकाणी बसवून आपला सांस्कृतिक निषेध कव्वालीच्या माध्यमाने सुद्धा करता येऊ शकतो हे प्रत्यक्ष कृतीने करून दाखविले व त्या साठी हजारोच्या संख्येने तरुणांची आजची उपस्थिती लक्षणीय होती त्याच सोबत पोलिसांचे सहकार्य सुद्धा मिळाल्याने त्यांचे सुद्धा आभार मंच चे समन्वयक फारुक शेख व करीम सालार यांनी उपोषणस्थळी सार्वजनिक रित्या मानले.

*भारत बंद व उपोषण*
बामसेफ या संघटनेने भारत बंद चे आव्हान केले होते तसेच जळगाव मुस्लिम मंच चे साखळी उपोषणाचा ३४ वा दिवस असल्याने बरोबर दहा वाजेपासून आज तरुणाना मुस्लिम मंचतर्फे आव्हान करून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्रित करण्यात आले व याच ठिकाणी जळगाव तांबापुर येथील शेकडो तरुण व शहरातील इतर ठिकाणचे तरुण हजारोच्या संख्येने उपस्थित झाले.
*देश भक्ति पर कव्वाली*
ताम्बापुर येथील राष्ट्रीय कव्वाल लतिफ हैरा यांचे कुटुंब रासीक हैरा , ढोलक नवाज शाहरुख शेख, तबला नवाज क़दीर शेख, कोर्स अलीम हैरा, व अख्तर कव्वाल आदींनी भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून देशभक्तीपर कव्वाली सादर केली.
वेगवेगळ्या कव्वाली व देशभक्तीपर गीते सादर करून त्यांनी तरुणाईला अक्षरशः बेभान करून दिले परंतु त्या तरुणाईला वेळीच आव्हान देऊन या कायद्याला विरोध करण्यासाठी लोकशाहीने दिलेल्या कर्तव्य नुसारच याचा विरोध करण्यात यावा ही मोलाची सूचनासुद्धा आयोजक वारंवार देत होते.
*सादर केलेल्या काही कव्वाली मधील शेर*

*मै तुम्हे अपने वूसोलो की कसम देता हु। मुझको मजहब की तराजू मे ना तोला जाये।।*
*मैने इंसान ही रहने की कसम खाई है, मुझको हिंदू या मुसलमान में ना समजा जाए।।*
उपोषणाची सुरुवात मुफ़्ती अबुजर च्या पवित्र कुराण पठाणाने झाली शरीफ शाह बापू यांनी नात सादर केली.

आसिफ शेख, करीम सालार, इमरान उमर ,शरीफ शाह व फारुक शेख यांची समायोचित भाषणे झाली.

माननीय उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना शरीफ शाह बापू यांच्या नेतृत्वाखाली कव्वाल रासिक हैरा, शाहरुख शेख यांनी निवेदन दिले
*उपोषणातील क्षणचित्रे*
■आयोजकांनी आपली नेहमीप्रमाणे दानपेटी फिरवली असता कव्वाल रासिक हैराँ यांनी सूचित केले की जे काही मानधन आम्हाला श्रोते कडुन मिळेल ते आम्ही समितीला दान करु त्याप्रमाणे दीड तासात ५१ हजार रुपयांची निधी त्या ठिकाणी जमा झाला.

■साऊंड सिस्टिम चे खालिद तेली यांनीसुद्धा कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता सदर ठिकाणी साऊंड सिस्टिम फ्री करून दीली
■ गुलाब बागवान, डॉक्टर अमानुल्ला शाह व नशिराबादचे शेख महंमद यांचा या निधी मध्ये फार मोठा सहभाग आहे.
■मंच तर्फे तरुणानी घरी शांततेत जावे असे आव्हान करीम सालार व फारूक शेख यांनी करताच त्यास तेवढ्याच प्रकारे प्रतिसाद देण्यात आला
■हाफिज च्या दुआँ ने सांगता झाली.
■निजाम मुलतानी,सानिर सैयद,अनवर सिकलीगर,मोहसिन सिकलीगर,अल्ताफ मनियार,ताहेर शेख,फारूक अहेलेकर,अकील पठान,अकील चप्पलवाले, यांनी सहकार्य केले.